आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Captures Afghanistan Rebel Leader Ahmad Massoud Army Getting Ready For Fight With Taliban In Panjshir Province

स्वतंत्र पंजशीरमध्ये युद्धाची परिस्थिती:बंडखोर नेता अहमद मसूदची चर्चेसाठी सहमती, मात्र लष्करही तयार; मुकाबला करण्यासाठी रवाना झाले हजारो तालिबानी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानच्या ताब्यात नसलेल्या अफगाणिस्तानमधील काही भागांपैकी एक म्हणजे पंजशीर खोरे आहे. येथील बंडखोरांचे नेतृत्व करणारे अहमद मसूदचे सेनानी लढाईसाठी सज्ज झाले आहेत. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट (नॉर्दर्न अलायन्स) चे नेतृत्व करणारे मसूद म्हणाले की, युद्धाची तयारी आहे, पण जर मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली, त्यासाठीही तयार आहे.

बंडखोरी दडपण्यासाठी हजारो तालिबान लढाऊंना पंजशीर खोऱ्यात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती तालिबानने ट्विटरवरुन दिली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने पंजशीर आमच्याकडे सोपवण्यास नकार दिला आहे. यानंतर आम्ही आमचे सेनानी तिथे कंट्रोल करण्यासाठी पाठवले आहेत. तालिबान समर्थक ट्विटर हँडलवरून याचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.

तालिबानकडून 300 लढाऊ मारल्याच्या वृत्ताला खंडन
सूत्रांनी भास्करला आधी सांगितले होते की, तालिबान्यांना पंजशीरच्या लढाऊंनी वाटेतच अडवून हल्ला केला होता. या हल्ल्यात 300 तालिबानी लढाऊंना मारले होते. त्यानंतर तालिबानने लढाऊ मारल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. तालिबानने सांगितले की, आता ते पंजशीरच्या दोन जिल्ह्यांवर ताबा मिळवत आहे.

पंजशीरमध्ये तालिबानशी लढण्यासाठी 9 हजार सैनीक तैनात
अहमद मसूद पंजशीरमधील बंडखोर नेत्यांमध्ये सामील झाला आहे. अफगाण सैन्य आणि तालिबान बंडखोरही एकत्र जमले आहेत. रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते अली मैसम नजारी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, तालिबानच्या विरोधात सुमारे 9,000 सैनिकांची फौज तयार करण्यात आली आहे. या सैन्यांना सतत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्याकडे वाहने आणि शस्त्रेही आहेत. नझारी म्हणाले की, सरकार चालवण्यासाठी आम्हाला नवीन व्यवस्था हवी आहे आणि त्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार आहोत. पण गरज पडली तर आम्ही लढायला मागे हटणार नाही.

हक्कानीचा दावा - मसूद सोबत येण्यास तयार
तालिबानही पंजशीर प्रकरणाच्या लवकर निकालाच्या बाजूने आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की जर पंजशीरच्या लढवय्यांना शांत केले नाही तर त्यांना सरकार चालवताना अडचणींना सामोरे जावे लागेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान वाटाघाटी करणारे सरकारमध्ये सामील होण्यासाठी अहमद मसूदसोबत सतत चर्चा करत आहेत. आतापर्यंत कोणताही करार झालेला नाही. हक्कानीच्या दाव्यांना अजून दुजोरा मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...