आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमध्ये बॉम्‍ब हल्‍ला:तालिबानचा धर्मगुरू मुल्ला मुजीबचा बाॅम्बहल्ल्यात मृत्यू, एकूण 18 जणांचा मृत्यू

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानच्या हेराट प्रांतात शुक्रवारी नमाजनंतर मोठा स्फोट झाला. त्यात तालिबानचे धर्मगुरू मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारीसह १८ जणांचा मृत्यू झाला. घटनेत २१ नागरिक जखमी झाले. ही घटना गाजारघ शहरात घडली. मशिदीत एकूण दोन स्फोट झाले. स्फोट झाला तेव्हा नमाज सुरू होता. मुल्ला मुजीब या मशिदीचा प्रमुख इमाम होता. स्फोट त्याच्या समोरील रांगेत झाला. हा आत्मघाती हल्ला असल्याचे सांगितले जाते. हा हल्ला दोन हल्लेखोरांनी केला, असा प्राथमिक अंदाज आहे. काही तासांपूर्वी हेराटमधील अर्थ परिषदेत हजेरी लावून आल्यानंतर मुल्ला मुजीब मशिदीत दाखल झाला होता. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आहे.

बातम्या आणखी आहेत...