आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban । Ebn E Sena University । Afghanistan । Kabul । Taliban News In Hindi । Taliban Latest News And Live Updates

अफगाणिस्तानात पडद्यामध्ये शिक्षण:मुली बुरखा घालून शाळेत जातील, मुले-मुली एकमेकांना पाहू नये म्हणून वर्गात पडद्याची व्यवस्था

काबूल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलांनी बुरखा घालायला केली सुरुवात

अफगाणिस्तानात गेल्या एक महिन्यापासून गोंधळ उडाला आहे. अफगाणिस्तानात एकीकडे सरकार स्थापनेबाबत हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे, देशातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरु करण्यात आले आहेत. तालिबान राजवटीत मुलींना शिक्षण घेण्याची परवागनी तर मिळाली आहे पण त्यांना कडक निर्बंधातून जावे लागत आहे.

तालिबानने मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत एक नवीन फर्माण जारी केले आहे. यामध्ये पडद्याच्या माध्यमातून वर्गाला दोन भागात विभागले गेले आहेत. यामुळे पडद्याच्या एका बाजूला मुली बसतात आणि दुसऱ्या बाजूला मुले बसतात. मुले-मुली एकमेकांना पाहू नये म्हणून वर्गात पडद्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी मजार-ए-शरीफ स्थित इब्न-ए-सीना विद्यापीठाचा एक फोटो समोर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

हा फोटो इब्न-ए-सीना विद्यापीठाचा आहे. येथे वर्गात पडदा लावून मुले आणि मुलींमध्ये विभाजन केले गेले आहे.
हा फोटो इब्न-ए-सीना विद्यापीठाचा आहे. येथे वर्गात पडदा लावून मुले आणि मुलींमध्ये विभाजन केले गेले आहे.

मुलींना हे आदेश पाळावे लागतील

  • कॉलेज-विद्यापीठात जाणाऱ्या प्रत्येक मुलीला मास्क घालावा लागेल.
  • खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींना बुरखा घालावा लागेल.
  • प्रत्येक मुलीला आपला चेहरा बहुतेक वेळा झाकून ठेवावा लागेल.
मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करू नका अशा कठोर सूचना तालिबान्यांनी मुलांना दिल्या आहेत.
मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करू नका अशा कठोर सूचना तालिबान्यांनी मुलांना दिल्या आहेत.

महिलांनी बुरखा घालायला केली सुरुवात
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीपूर्वी खूप कमी स्त्रिया रस्त्यावर बुरखा आणि कपडा घालताना दिसत होत्या. परंतु, आता तालिबानचे राज्य आल्यानंतर सर्वच महिला घालायला लागल्या आहेत. तालिबानने महिलांना असे कपडे घालण्यास सांगितले की, ज्यामध्ये चेहऱ्याचे प्रत्येक भाग झाकले जातील.

मुला-मुलींसाठी महिला शिक्षकांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसे महिला शिक्षक नाहीत असे अफगाणिस्तानातील प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
मुला-मुलींसाठी महिला शिक्षकांची व्यवस्था करण्यासाठी पुरेसे महिला शिक्षक नाहीत असे अफगाणिस्तानातील प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

मुलींना फक्त महिला शिक्षिका शिकवतील
तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर मुलींच्या शिक्षणाबाबत काही आदेश दिले होते. आदेशानुसार, मुले आणि मुलींना एकाच वर्गात शिकता येणार नाहीये. त्यासाठी वर्गात वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुलींना केवळ महिला शिक्षिकाच शिकवू शकतील. त्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात महिला शिक्षिकांची भरती करण्यात येणार आहे. जर महिला शिक्षिका मिळाल्या नाही तर वयस्कर पुरुष शिक्षक मुलींना शिकवू शकतील. परंतु, त्यांच्या मागच्या रेकॉर्डची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना परवानगी दिली जाईल.

मुली कॉलेजमधून बाहेर पडल्या आहेत याची पुष्टी करण्यासाठी मुलींचा वर्ग मुलांच्या 5 मिनिटांपूर्वी संपणार आहे.
मुली कॉलेजमधून बाहेर पडल्या आहेत याची पुष्टी करण्यासाठी मुलींचा वर्ग मुलांच्या 5 मिनिटांपूर्वी संपणार आहे.

विद्यापीठ-महाविद्यालयात महिला शिक्षिकांची कमतरता
या आदेशानुसार, मुली कॉलेजमधून बाहेर पडल्या आहेत याची पुष्टी करण्यासाठी मुलींचा वर्ग मुलांच्या 5 मिनिटांपूर्वी संपेल. महाविद्यालयात मुला-मुलींना एकमेकांशी बोलण्याची परवानगी दिली जाणार नाही. अफगाणिस्तानातील जास्तीत जास्त विद्यापीठांमध्ये महिला शिक्षिका कमतरता असल्याचे एएफपीशी बोलताना अफगाणिस्तानमधील एका प्राध्यापकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...