आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानचे सैन्य व तालिबान यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. संघर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दाेन महिन्यांत सुमारे तीन लाख अफगाणींना आपल्याच देशात बेघर जगावे लागत आहे. सुमारे ४० हजार अफगाणींनी जीव मुठीत घेऊन इराण गाठले आहे. या लाेकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच देश साेडला हाेता. तालिबानने शुक्रवारी शेबरगान शहरातील तुरुंगावर हल्ला करून येथे बंद ७०० दहशतवाद्यांची सुटका केली. संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन फाॅर मायग्रेशनच्या (आयआेएम) अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार तालिबानी हल्ल्यांपासून बचावासाठी अफगाणिस्तानातील अनेक कुटुंबे इतर ठिकाणी स्थलांतरित झाली. संकट असूनही काही लाेक परदेशातून मायदेशी परतले आहेत. त्यात काेराेनामुळे पाकिस्तान व इराणने हकालपट्टी केलेल्यांचा समावेश आहे. आता हे लाेक अफगाणिस्तानात भाेजन, कपडे, निवास इत्यादी समस्यांना ताेंड देत आहेत.
हेल्मंड प्रांतात ११२ तालिबानींचा खात्मा
अफगाण सैन्याने हेल्मंड प्रांतात ३० पाकिस्तानींसह ११२ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात पाकिस्तानच्या अल-कायदाचे दहशतवादीही हाेते. ते तालिबानचे साथीदार हाेते. अफगाण सैन्याने हवाई हल्ले केेले हाेते.
त्यात ३१ दहशतवादी जखमी झाले. सैन्याने २४ तासांत कंदहार, हेरातसह १५ हून जास्त प्रांतात ३८५ तालिबानी अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. २१० तालिबान जखमी झाले.
निम्मे लाेक गरिबीशी झुंजताहेत
आयआेएम अफगाणिस्तान मिशनचे प्रमुख स्टुअर्ट सिम्पसन म्हणाले, अफगाणची परिस्थिती खराब हाेत चालली आहे. संपूर्ण जगाने लक्ष द्यायला हवे. १.८५ काेटी म्हणजे निम्मे लाेक हिंसाचाराबराेबरच प्रचंड दारिद्र्याचाही मुकाबला करत आहेत.
फतवा : मुली बाहेर दिसल्या तर उचलून नेऊ
तालिबानने बदख्शां, तखर व गझनी प्रांतात फतवा जारी केला आहे. १२ वर्षांहून जास्त वयाच्या मुली, विधवा महिला घराबाहेर एकट्या दिसून आल्यास त्यांना तालिबानी उचलून नेतील. अफगाण महिलांना शरिया कायदा लागू राहील. तालिबानने हा कायदा १९९६-२००१ दरम्यान लागू केला हाेता. तेव्हा तालिबानचे अफगाणिस्तानवर वर्चस्व हाेते. तालिबानी राज्यातील सुरक्षा दलाच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करू लागले आहेत.
पख्तिया प्रांतात निशाणसाहिब सन्मानपूर्वक बहाल
पख्तिया प्रांता गुरुद्वाराच्या छतावर निशाणसाहिबला पुन्हा सन्मान देण्यात आला. इंडियन वर्ल्ड फाेरमचे अध्यक्ष पुनीतसिंग चंडाेक यांनी ही माहिती दिली. तालिबानने ते हटवले हाेते.
अमेरिकेने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर अफगाणिस्तान साेडण्याची सूचना केली आहे. खासगी विमानाने मायदेशी परतावे. सुरक्षेचा विचारातून दक्षतेची सूचना दिल्याचे दूतावासाने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.