आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Funding Source; Where Does Taliban Funding Come From In Afghanistan? All You Need To Know; News And Live Updates

तालिबानच्या कमाईचे रहस्य:अफगाणिस्तानावर ताबा मिळवणाऱ्या दहशतवादी संघटनेजवळ कोठून येतो एवढा पैसा? जाणून घ्या त्यांच्या कमाईचे रहस्य!

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानची वार्षिक उलाढाल सुमारे 3 हजार कोटी रुपये

अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी 20 वर्षानंतर पुन्हा एकदा ताबा मिळवला आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेताच संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. विमानतळावर लोकं मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून विमानात जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रवास करत आहे. दरम्यान आतापर्यंत यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतात तालिबान्यांनी 20 दिवसात संपूर्ण देशावर ताबा मिळवला. अमेरिकेवर मात करणाऱ्या तालिबान्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे? याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया... तालिबान्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत.

तालिबान्यांचा मोठा स्त्रोत अफू
अफगाणिस्तानात गांजाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथे जगातील अफूच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन होते. विशेष मालिकांच्या संपूर्ण उत्पादनावर तालिबान्यांचा ताबा आहे. अफूच्या विक्री व तस्करीतून तालिबान्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. व हा त्यांचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो.

UNODC च्या मते, गेल्या चार वर्षात अफगाणिस्तानमध्ये अफूचे सर्वात जास्त उत्पन्न घेतले गेले आहे. कोरोना काळातही अफगाणिस्तानमध्ये अफूच्या उत्पादनात 37 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

2017 मध्ये 9900 टन अफूचे उत्पादन
UNODC च्या मते, अफगाणिस्तानात 2017 मध्ये अफूचे 9900 टन उत्पादन झाले. शेतकऱ्यांना यामाध्यमातून सुमारे 10 हजार कोटी रुपये कमावले असून हे देशाच्या GDP च्या 7% होते. अहवालानुसार, बेकायदेशीर अफूची अर्थव्यवस्था सुमारे 49,000 कोटी रुपये होती. यामध्ये स्थानिक वापर, औषधांसाठी निर्यात आणि इतरांचा समावेश आहे.

तालिबानची वार्षिक उलाढाल सुमारे 3 हजार कोटी रुपये
अफूच्या माध्यमातून तालिबानला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. परंतु, तालिबान या व्यवहाराचा कोणताही तपशील प्रसिद्ध करत नाही. यामुळे त्यांचे एकूण मालमत्ता किती आहे हे सांगणे कठीण आहे. फोर्ब्सने 2016 मध्ये तालिबानची वार्षिक उलाढाल 2,968 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता.

बातम्या आणखी आहेत...