आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban । Imran Khan । Tehreek E Taliban । Zabihullah Mujahid । Pakistan । Religious Figures

पाकिस्तानला तालिबानी झटका:तालिबानने म्हटले - तहरीक-ए-तालिबानसोबत आपले प्रश्न इम्रान यांनी स्वतः सोडवावे, अफगाणिस्तान दखल देणार नाही

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानच्या तुरुंगात बंद होते TTP चे लोक

अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबानने पाकिस्तान सरकारला सल्ला दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तहरीक ए तालिबान पाकिस्तान (TTP)सोबतचे प्रश्न स्वतः सोडवावेत. तथापि, त्यांनी टीटीपीला सल्ला दिला की जर ते तालिबानला आपला नेता मानत असतील तर त्यांनी आमचे ऐकावे.

जबीउल्लाह मुजाहिद यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एक दिवस पाकिस्तानला तहरीक-ए-तालिबानशी चर्चा करावी लागेल. अफगाणिस्तान यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. मात्र, तालिबान अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरोधात वापरू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुजाहिद यांनी केला. अफगाणिस्तानात शासन करणारे आगामी तालिबान सरकार यावर निर्णय घेईल.

अफगाणिस्तानच्या तुरुंगात बंद होते TTP चे लोक
तहरीक-ए-तालिबानचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानातील तुरुंगात बंद होते. यांना तालिबान्यांनी अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर सोडले. अफगाणिस्तानात नवीन सरकार कधी स्थापन होईल? या प्रश्नावर मुजाहिद म्हणाले की अफगाणिस्तानमध्ये काही दिवसात तालिबान सरकार स्थापन करेल. सर्व पक्षांशी चर्चा झाली आहे. सरकार स्थापनेच्या विलंबामुळे तालिबानलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे व्यापार आणि मुत्सद्देगिरीमध्येही समस्या निर्माण होत आहेत.

काबूल विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका
ISIS-खुरासान (ISIS-K)चे फिदायीन (आत्मघाती बॉम्बर) काबूल विमानतळाला पुन्हा लक्ष्य करू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी शनिवारी रात्री उशिरा इशारा दिला की काबुल विमानतळावर पुढील 24 ते 36 तासांमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो. बायडेन यांनी म्हटले आहे की परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे आणि विमानतळावरील धोका खूप वाढला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हे विधान केले.

यानंतर, अमेरिकन दूतावासाने सलग तिसऱ्या दिवशी काबूल विमानतळावर हल्ल्याच्या धोक्याचा इशारा जारी केला आहे. ताज्या इशाऱ्यात अमेरिकेने आपल्या नागरिकांना काबूल विमानतळ आणि त्याच्या आसपासच्या भागातून त्वरित माघार घेण्यास सांगितले आहे. अमेरिकेने गुरुवारी काबूल विमानतळावर धोक्याबाबत पहिला अलर्ट जारी केला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी ISIS-खुरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...