आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात तालिबान्यांची भीती:हजारा समाजाच्या मुलींशी जबरदस्तीने लग्न करताहेत तालिबानी; भीतीपोटी लोक तरुण मुलींना पाठवत आहेत काबूलला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 ऑगस्ट 1998 रोजी तालिबानच्या लढाकुंनी अफगाणिस्तानच्या मजार-ए-शरीफमध्ये दाखल होताच गोंधळ घाल्याण्यास सुरुवात केली. जो जीथे सामडेल त्याला गोळ्या घातल्या. अनेक दिवस तिथे हजारा समाजातील हजारो लोकांना निवडून ठार मारले. तालिबान्यांनी मृतदेह दफन करण्यासही परवानगी दिली नाही. तेव्हा बल्खचे तालिबानी गव्हर्नर मुल्ला मन्नान नियाजी ने एका भाषणात म्हटले होते, "उझ्बेकी लोकांना उझ्बेकिस्तानला निघून जावे, ताजिक लोक ताजिकिस्तानला निघून जा आणि हजारा यांनी एकतर मुसलमान बना किंवा स्मशानात जा.

आता 23 वर्षांनंतर तालिबानचे राज्य पुन्हा एकदा अफगाणिस्तानात परतले आहे. यामुळे हजारा लोक भीतीच्या छायेत आहे. अनेक ठिकाणी तालिबान लढाकू त्यांच्या मुलींशी जबरदस्तीने लग्न करत आहे. असे अहवाल आले आहेत. मात्र, अद्याप याला दुजोरा देण्यात आला नाही. तर काही भागात खून झाल्याचेही वृत्त आहे.

हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. ज्यांना अनेक दशकांपासून छळले जात आहे. हे शिया मुस्लिम, अफगाण लोकसंख्येच्या सुमारे 10%, जगातील सर्वात जास्त छळले गेलेले अल्पसंख्यांक आहेत. कट्टरपंथी सुन्नी त्यांना मुस्लिम मानत नाहीत.

हजारा नेत्याच्या मूर्तीचे डोके कापून पसरवली दहशत
काबुलमधील तालिबान जागतिक माध्यमांना "शांतता आणि सुरक्षिततेचे" आश्वासन देत होते, त्याचवेळी बामियानमधून हजारा नेता अब्दुल अली मजारी यांचा पुतळा पाडल्याच्या बातम्या आल्या. 1995 मध्ये तालिबान्यांनी मजारीची हत्या केली होती. अफगाणिस्तानमधील हजारा समाज हा अनेक दशकांपासून हिंसाचाराचा बळी ठरला आहे.

डॉ. सलीम जावेद पेशाने डॉक्टर आहेत आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते स्वीडनमध्ये राहतात आणि बराच काळ ते हजारा यांच्या समस्यांवर लिहित आहे. भास्करशी बोलताना त्यांनी मजारी यांची मूर्ती पाडल्याच्या बातमीला दुजोरा केली. डॉ..जावेद म्हणतात, 'मजारीच्या मूर्तीचे शिर कापले गेले आणि जमिनीवर ठेवण्यात आले. हजारा लोकांनीही याचा निषेध केला.

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने मंगळवारी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही तासांतच अब्दुल मजारी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. तालिबानच्या अधिपत्याखाली सर्व सुरक्षित आहेत आणि प्रत्येकाला त्यांचे हक्क दिले जातील असा दावा जबीउल्ला मुजाहिद यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता.

डॉ. जावेद सांगतात की, 'तालिबान आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे आणि त्याने हजारा लोकांना घाबरवले आहे. तालिबान म्हणत आहेत की आता त्यांनी आंतरराष्ट्रीय फोर्सेसलाही पराभूत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...