आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट:अल-कायदाने तालिबानला विजयाच्या दिल्या शुभेच्छा, धर्माच्या शत्रूंना काश्मीर आणि दुसऱ्या इस्लामीक जमिनींच्या स्वातंत्र्याचे आवाहन केले

काबुल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान शांतता करार स्वीकारत नाही

अल-कायदा या दहशतवादी संघटनेने मंगळवारी तालिबानचे अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल अभिनंदन केले. या अभिनंदनपर संदेशात अल-कायदा ने इस्लामच्या शत्रूंना काश्मीर आणि इतर इस्लामिक जमिनींच्या स्वातंत्र्याचे आवाहन केले. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला स्वतंत्र घोषित केले. संदेशात, अल कायदाने पॅलेस्टाईन, लेव्हेंट, सोमालिया आणि यमनसारख्या प्रदेशांच्या स्वातंत्र्याची मागणी केली.

अल कायदाचा संदेश
अल कायदा ने 'इस्लामिक उम्माहला अफगाणिस्तानात अल्लाहने दिलेल्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा' असा संदेश जारी केला आहे. त्यात लिहिले - हे अल्लाह! लेवेंट, सोमालिया, येमेन, काश्मीर आणि जगातील इतर इस्लामिक भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा. अल्लाह जगभरातील मुस्लिम कैद्यांना स्वातंत्र्य द्यावे.'

तालिबान शांतता करार स्वीकारत नाही
15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर दक्षिण आशियात कार्यरत दहशतवादी समूनह पुन्हा पाय पसरवण्याची शक्यता वाढली आहे. अनेक देशांचे क्षेत्रीय विश्लेषक आणि सुरक्षा अधिकारी या प्रकरणाबद्दल चिंतित आहेत.

अमेरिका आणि तालिबान यांच्यात फेब्रुवारी 2020 मध्ये शांतता करार झाला. कराराच्या अटींपैकी एक म्हणजे तालिबानचे दहशतवादी संघटनांशी आणि विशेषतः अल-कायदाशी कोणतेही संबंध नसतील. मात्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात तालिबानने अल-कायदाशी संबंध तोडल्याचे किंवा संबंध कमी केल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत.

जिहादनेच विजय मिळेल
अल कायदाने अमेरिकेला सैतानाचे राज्य म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी तालिबानच्या या विजयाचे वर्णन जगातील शोषित लोकांसाठी प्रेरणा म्हणून केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या सर्व घटना सिद्ध करतात की जिहादद्वारेच विजय मिळवता येतो. अफगाणिस्तान हे अनेक महासत्तांचे स्मशान आणि इस्लामचा अजिंक्य किल्ला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ही तिसरी वेळ आहे, जेव्हा अफगाणिस्तानने दोनशे वर्षांच्या आत एखाद्या आक्रमणकारी शक्तीला हरवले आहे.

बातम्या आणखी आहेत...