आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Kashmir | Taliban Suhail Shaheen Says Right To Raise Voice For Muslims In Kashmir; News And Live Updates

काश्मीरबाबत तालिबानचे बदलले सूर:प्रवक्ते म्हणाले - काश्मीर काय, भारतासह कोणत्याही देशातील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार

काबूल/नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी तालिबानने म्हटले होते - काश्मीर द्विपक्षीय प्रकरण

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येताच काश्मीरबाबत तालिबान्यांचे सूर बदलले आहे. दरम्यान, काही वेळातच अफगाणिस्तानात नवीन सरकारची घोषणा होईल. परंतु, सरकारच्या घोषणेपूर्वीच तालिबान्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली आहे. काश्मीर काय, भारतासह कोणत्याही देशातील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे. मुस्लीम हे आमचे स्वत:चे लोक असून ते आमचे नागरिक आहे त्यामुळे त्यांना कायद्यानुसार समान हक्क मिळायला हवेत असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी संध्याकाळी एका मुलाखतीत बोलत होते.

यापूर्वी तालिबानने म्हटले होते - काश्मीर द्विपक्षीय प्रकरण
काश्मीरच्या मुद्यांवर अनेक तालिबानी नेत्यांनी यापूर्वी टीप्पणी केली आहे. काश्मीर हा द्विपक्षीय आणि अंतर्गत मुद्दा असल्याचे तालिबानी नेत्यांनी म्हटले होते. परंतु, आता सत्तेत येताच तालिबानचे सूर बदलले आहे. अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी वापरली जाऊ नये, हे भारताचे ध्येय असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागजी म्हणाले होते.

इस्लामच्या शत्रूंपासून काश्मीर मुक्त करा - अल-कायदा
अफगाणिस्तानातील विजयाबद्दल अल-कायदा या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, या संदेशात अल-कायदाने काश्मीर आणि इतर इस्लामिक जमिनी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त असे म्हटले होते. अल कायदाने पॅलेस्टाईन, लेव्हेंट, सोमालिया आणि येमेनसारख्या प्रदेशांच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...