आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचे मोठे बंधू रोहल्लाह सालेह यांच्या हत्येनंतर तालिबान आता त्यांचे पार्थिव देण्यास नकार देत आहे. रोहुल्ला यांचा पुतण्या इबादुल्ला सालेहने म्हटले की तालिबानने गुरुवारी त्याच्या काकाची हत्या केली होती आणि त्यांचा मृतदेह मागितला असता तालिबानने तो देण्यास नकार दिला. तालिबानने सांगितले की आम्ही त्याला दफन करू देणार नाही, त्याचा मृतदेह सडला पाहिजे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहुल्लाह सालेहची तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यात हत्या केली. तालिबान्यांनी प्रथम सालेहला चाबकाने आणि विजेच्या तारांनी मारले, नंतर त्याचा गळा कापला. नंतर तडफडत असलेल्या साहेल यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्या.
असे सांगितले जात आहे की रोहुल्लाह सालेह पंजशीरहून काबुलला जात होते. तालिबान्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी सालेह यांना घेरले, कैद केले आणि नंतर निर्घृणपणे हत्या केली. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या हत्येची बातमी समोर आली. मात्र, यावर अमरुल्ला सालेहची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
तालिबानने पंजशीरच्या दोन बड्या नेत्यांचीही केली आहे हत्या
तालिबानने काही दिवसांपूर्वी पंजशीर येथे विजयाचा दावा केला होता. त्याने पाकिस्तानी हवाई दलाच्या मदतीने पंजशीरच्या दोन मोठ्या नेत्यांची हत्या केली होती. तालिबानने नॉर्दर्न अलायन्सचे कमांडर आणि बंडखोर प्रवक्ते फहीम दश्ती आणि जनरल अहमद शाह मसूद यांचा पुतण्या जनरल वदुद यांना ठार केले, जे पंजशीरचे शेर म्हणून ओळखले जातात.
घनीने देश सोडल्यानंतर अमरुल्ला सालेहने स्वत: ला राष्ट्रपती घोषित केले होते
तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले. यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. त्याच वेळी, त्यांनी, पंजशीरच्या लढवय्यांसह, राष्ट्रीय प्रतिरोध दलाच्या बॅनरखाली तालिबानविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले.
तालिबानने पंजशीरमधील त्या जागेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे जिथे काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी व्हिडिओ जारी केला होता. अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या दाव्यांचे खंडन करत एक व्हिडिओ जारी केला, ते म्हणाले की ते पंजशीरमध्ये उपस्थित आहेत आणि मृत्यूपर्यंत तेथेच राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.