आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Militants Occupy 20 Of 34 Provinces, Just 11 Km From The Capital Kabul, To Reorganize The Army

धुमसते अफगाणिस्तान:राजधानी काबूलपासून अवघ्या 11 किमीवर तालिबानी अतिरेकी, 34 पैकी 20 प्रांतांवर कब्जा, लष्कराला पुन्हा संघटित करणार

वृत्तसंस्था| काबूल / नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्राध्यक्ष गनी; हजारो अफगाणी नागरिकांचे लाेंढे पाकिस्तानच्या दिशेने

अफगाणिस्तानवर तालिबानचा विळखा घट्ट होत चालला आहे. तालिबानने शनिवारी राजधानी काबूलच्या दक्षिणेकडील लोगार प्रांतावर कब्जा केला. तसेच मजार-ए-शरीफ शहरही काबीज केले. पाकिस्तानच्या सीमेलगतच्या पकतिका प्रांताची राजधानी शरनावरही तालिबान्यांनी ताबा मिळवला.

लोगार प्रांताच्या खासदार होमा अहमदी म्हणाल्या, तालिबानने राजधानीसह संपूर्ण प्रांतावर कब्जा केला आहे. ते शनिवारी काबूल प्रांतानजीकच्या एका जिल्ह्यातही पोहोचले. तालिबान राजधानी काबूलपासून केवळ ११ किमीवर आहे. ते दक्षिणेकडून ८० किमी दूर आहेत. तालिबानने ३४ पैकी २० प्रांतांवर ताबा मिळवला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी राष्ट्राला संबाेधित करताना म्हणाले, सरकार हिंसा व लोकांचे विस्थापन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थैर्य सुनिश्चित करत आहे. अफगाणींवर ‘लादलेल्या युद्धात’ आणखी हत्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. सध्या अफगाण सुरक्षा व लष्कराला पुन्हा संघटित करणे सरकारची सर्वोच्च प्राथमिकता अाहे. सरकारने लोकप्रतिनिधी आणि अांतरराष्ट्रीय भागीदारांसोबत योग्य राजकीय तोडग्यासाठी विचारविनिमय सुरू केला आहे.

भारतासमोर अनेक पर्याय, पण सर्वच धोकादायक
भास्कर एक्स्पर्ट
शशांक, निवृत्त परराष्ट्र सचिव
भारतासमोरील सर्वात मोठे अाव्हान म्हणजे आपले राजनैतिक अधिकारी, नागरिक, स्वयंसेवकांचे संरक्षण करणे. तालिबानी वर्चस्वामुळे लष्कर-ए-तोयबा, जैश- ए-मोहंमद आदींना मोकळे रान मिळणार आहे. भारतीयांनी अफगाणमधून परागंदा व्हावे यासाठी आस्थापना, मालमत्तांवर ते हल्ले करू शकतात. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची लुडबुड आणि कारवाया वाढत जातील.

अफगाणी लष्करास रसद पुरवठा करावा

  • अमेरिका व सहकारी देशांमध्ये समन्वय साधून अफगाणसाठी पाठिंबा मिळ‌‌वण्याचा प्रयत्न करणे. यामुळे अफगाणी लष्कर स्वत:चे वर्चस्व शाबूत ठेवू शकेल. परंतु तालिबान्यांसोबत चर्चेची कवाडे बंद होतील.
  • काबूलच्या विद्यमान सरकारला पाठिंबा कायम ठेवणे. माणुसकीच्या नात्याने शक्य तितके दिवस मदत केली जावी
  • अफगाणी लष्करास रसद पुरवठा केला जावा. त्यांच्या वायुदलास बळ द्यावे. तालिबानला याचा धोका वाटतोय म्हणूनच भारताला इशारे दिले जात आहेत. वास्तविक या धमक्या पाकिस्तान देत आहे.
  • तालिबान्यांशी थेट संपर्क साधला जावा.अर्थात पडद्यामागे ते सुरूही आहे. परंतु चीन-पाकिस्तानविरोधी तालिबानही अफगाणमध्ये सक्रिय आहे. त्यांच्याशी लवकर संपर्क साधून पैसा, साधने पुरवली जावी.
  • शेवटचा पर्याय सोपा मात्र धोकादायक आहे. तालिबान्यांवर लक्ष ठेवून त्यांना हद्दीतच मर्यािदत ठेवल्यास चीन व पाकिस्तानला या यादवीची झळ बसू शकेल.

तालिबानचा इशारा : देशात भारताने लष्करी हस्तक्षेप करू नये
तालिबानने अफगाणिस्तानात भारताची मदतकार्ये आणि विकासासंबंधी प्रयत्नांची स्तुती केली. तसेच म्हटले आहे की, अफगाणिस्तानात भारताने लष्करी भूमिका बजावू नये. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन म्हणाले, ‘भारताने आमच्या देशात लष्करी हस्तक्षेप केला तर ते त्यांच्यासाठी चांगले ठरणार नाही. अफगाणिस्तानात इतर देशाच्या लष्कराची स्थिती भारताने पाहिली आहे. आम्ही भारतासह इतर कोणत्याही देशांचे दूतावास आणि राजदूतांवर हल्ला करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...