आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइम्रान खान सरकार आधीच नवीन विधेयकासह माध्यमांवर कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत होते. परंतु, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) जळालेल्यावर मीठ शिंपडण्याचे काम केले आहे. टीटीपीने सर्व प्रसारमाध्यमांना खुले पत्र लिहित धमकी दिली आहे. पत्रात म्हटले की, देशातील कोणत्याही मीडिया हाऊसने तालिबान पाकिस्तानचा येथून पुढे दहशतवादी संघटन म्हणून उल्लेख करु नये, अन्यथा जी शिक्षा शत्रूंना दिले जाते तशी शिक्षा तुम्हाला मिळेल असे धमकीचे पत्र माध्यमांना दिले आहे. यामुळे माध्यम समूहात मोठी खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर जारी केले विधान
टीटीपीने सोमवारी सोशल मीडियावर एक पत्र जारी केले आहे. या निवेदनात तालिबान पाकिस्तानसाठी वापरल्या जाणाऱ्या नावांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन संघटनेचे प्रवक्ते मोहम्मद खुरासानी यांनी जारी केले आहे. खुरासानी म्हणाले की, पाकिस्तानातील माध्यम समूह टीटीपीसाठी दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटनांसारखे शब्द वापरत आहेत. ही पत्रकारितेच्या नावाखाली चुकीची गोष्ट आहे. परंतु, आता इथून पुढे असे काही खपवून घेतले जाणार नाही, जर कोणत्याही माध्यमांनी या शब्दाचा वापर केला तर त्यांच्यासोबत शत्रूंसारखे व्यवहार केले जाईल असे खुरासनी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
14 वर्षांपूर्वी टीटीपीची स्थापना
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची 2007 मध्ये स्थापना करण्यात आली होती. हा अफगाण तालिबानचा भाग असून याला पाकिस्तानात शरिया कायदा लागू करायचा आहे. पाकिस्तान सरकारने 2008 मध्ये यावर बंदी घातली होती. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे पहिले नेते बैतुल्ला मेहसूद हे होते. परंतु, 2009 मध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मेहसूद ठार झाला.
मीडिया सिलेक्टेड सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप टीपीपीने केला. त्यांचा हा इशारा विद्यमान सरकारकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. इम्रान यांचे सरकार लष्कराच्या इशाऱ्यावर चालत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टीटीपीने याआधीही पाकिस्तानी माध्यमांना धमकी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.