आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान:एका दिवसात 6 प्रांतांवर तालिबानी सत्ता, सरकारे शरण; सात दिवसांत 18 राज्यांवर वर्चस्व

काबूल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानचे सात दिवसांत 18 राज्यांवर वर्चस्व, अराजकाची स्थिती, अनेक नेते-गव्हर्नरनी शासन स्वीकारले

अफगाणिस्तानमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. एकानंतर दुसऱ्या प्रांतावर तालिबानचे वर्चस्व निर्माण होत असल्याचे दिसते. चोहीबाजूने अराजकाची स्थिती दिसते. तालिबानने शुक्रवारी एका दिवसात ६ प्रांतांवर सत्ता मिळवली. अफगाणिस्तानमधील सर्वात मोठे शहर कंदहारसह १८ प्रांतांना दहशतीचा विळखा घातला. गुरुवारच्या रात्री कंदहारवर ताबा मिळवला. सकाळी लष्करी छावण्यांचे शहर व पश्चिम प्रांत घोरच्या राजधानीवर वर्चस्व मिळवले. आता तालिबानचे लक्ष्य काबूल आहे. पश्चिमेकडील देशांनी आपल्या राजदूतांना अफगाण सोडण्याची तयारी केली आहे. तालिबानच्या विरोधात लढणारे गटही आता शरणागती पत्करू लागले आहेत. हेराट प्रांताच्या सरकारने असेच लोटांगण घातले. माजी मंत्री, हेराट प्रांताचे गव्हर्नर, पोलिस प्रमुख, एनडीएस कार्यालयाचे प्रमुख यांना तालिबानने ताब्यात घेतले. त्याशिवाय तालिबानच्या विरोधातील युद्धाचे प्रतीक राहिलेले मोहंमद इस्माईल खान (७५) यांना तालिबानने पकडले आहे. इस्माईल खान तालिबानविरोधात लढणाऱ्यांमध्ये अग्रेसर आहेत. तालिबानच्या वाढत्या कारवाया पाहून युरोपीय संघाने तालिबानला इशारा दिला आहे. तालिबानने हिंसाचारातून सत्ता काबीज केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणार नाही.

मुत्सद्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची तयारी
अमेरिका, ब्रिटन, कॅनडानेदेखील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. अमेरिकेने तीन हजार सैनिकांना पुन्हा अफगाणिस्तानात पाठवले आहे. ते मुत्सद्यांना सुरक्षित काढण्याचे काम करतील. ब्रिटन व कॅनडादेखील मुत्सद्यांना काढण्यासाठी विशेष दल पाठवत आहे. हे कमांडो काबूलमधील ब्रिटिश दूतावास व कॅनडाच्या दूतावासाला सोडण्यासाठी मुत्सद्दयांना मदत करतील. ब्रिटन ६०० सैनिक पाठवले आहेत.

तालिबान आता आपली संघटना बळकट करणे व उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी अंमली पदार्थाद्वारे कराच्या पैशावर नजर ठेवून आले. टोरंटो येथील थिंक टँकनुसार तालिबानला अफगाणिस्तानातून हटवण्यात आले होते. तेव्हा या दहशतवादी संघटनेने पैसा वसूल करून ताकद वाढवली. तालिबान अर्थव्यवस्थेच्या अनेक टप्प्यावर लावलेल्या करांतून पैसा कमावतो. त्यात अफीमचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून १० टक्के शेती कराचा समावेश आहे. तालिबान देशातील विविध भागात वीज ग्राहकांना देयके पाठवून वार्षिक २० लाख अमेरिकी डॉलरहून (सुमारे १४.८५ कोटी रुपये) जास्त कमाई करू लागला आहे. तालिबान अफगाणिस्तानच्या दोन लाख हेक्टरवर अफीमची शेती करत आहे.

बातम्या आणखी आहेत...