आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगानिस्तानात सत्ता बदलली!:काबूलवर ताबा मिळवल्यानंतर मुल्ला बरादरचे पहिले विधान - अपेक्षा नव्हती की एवढा लवकर अन् सहज विजय मिळेल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात ज्याची भीती होती, तेच घडले. तालिबानने राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. रविवारी तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

पहिली घटना- राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसह देश सोडला.

दुसरी घटना- तालिबानने राष्ट्रपती भवन (आर्ग) काबीज केले. रात्री उशिरा काही व्हिडिओ देखील समोर आले. यामध्ये तालिबान काबूलच्या रस्त्यावर फिरताना दिसतात.

तिसरी घटना- तालिबानी नेते मुल्ला बरदार यांचे मोठे विधान बाहेर आले. ते म्हणाले - सर्व लोकांचे जीवन आणि मालमत्ता संरक्षित केली जाईल. येत्या काही दिवसात सर्व काही नियंत्रणात येईल. आम्ही कधीच विचार केला नव्हता की जिंकणे इतके सोपे आणि इतके जलद होईल. येत्या काही दिवसात सर्व काही पूर्वपदावर येईल.

अमेरिकेकडून सुरक्षा अलर्ट जारी

काबूलमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान अमेरिकेने सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. त्यात म्हटले - विमानतळासह काबूलमधील सुरक्षा परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. काही अहवालांनुसार, विमानतळाला आग लागली आहे. अहवालांनुसार, काबूलमधील अमेरिकन दूतावास आता रिकामे झाले आहे. अमेरिकेचे राजदूतही अफगाणिस्तानातून निघून गेले आहेत.

प्रवाशांविना निघाली अनेक विमाने
काबूल विमानतळाचे कर्मचारी घाईघाईने पळून गेले, ज्यामुळे अनेक वमानांनी प्रवाशांशिवाय उड्डाण केले. यावेळी आता काबूल विमानतळावर सध्या एकही नागरी विमान नाही. फक्त अमेरिकन लष्करी विमाने आहेत. एक प्रकारे, विमानतळ प्रवासी उड्डाणांसाठी बंद आहे. फ्लाइट रडारनुसार सोमवारी उड्डाणे होणार आहेत. तालिबानच्या सूत्रांनी दैनिक भास्करला सांगितले की, काबूल विमानतळाच्या कामकाजावर परिणाम करण्याचा त्यांचा हेतू नाही आणि सर्व विमान कंपन्यांना उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली जाईल. जर्मनी आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना काबूलमधून बाहेर काढणार आहे. अमेरिका आणि इतर देशांना मदत करणाऱ्या अफगाण नागरिकांना बाहेर काढले जात आहे.

काही भागांमध्ये लूटमार
काबूलच्या काही भागात लूटमारही झाली आहे. तालिबान परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. सुमारे 200 अफगाणीही भारतात पोहोचले आहेत. यामध्ये अशरफ गनी यांचे वरिष्ठ सल्लागार आणि काही खासदारांचा समावेश आहे. अहवालांनुसार, तालिबानने काबूलमध्ये चोरी करुन पळून जाणाऱ्या तीन जणांना गोळ्या घातल्या. ज्यांनी दरोडा घातला त्यांना गोळ्या घातल्या जातील असे संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, ठार झालेले तिघे प्रत्यक्षात चोर होते की नाही, याची पुष्टी होऊ शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...