आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंधारमध्ये पोहोचले तालिबानी:आता कंधार सुद्धा तालिबान्यांच्या तावडीत! आतापर्यंत 12 प्रांतांवर मिळवला ताबा; भारतीय नागरिकांना अलर्ट- उड्डाण बंद होण्यापूर्वी परता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा - तालिबानला आश्रय देऊ नका

तालिबानने अफगाणिस्तानचे दुसरे मोठे शहर कंधार ताब्यात घेतले आहे. असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेच्या मते, तालिबानने आतापर्यंत 34 पैकी 12 प्रांतांवर आपले राज्य प्रस्थापित केले आहे. कंधार तालिबान्यांनी गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेतला.

तालिबानने एक व्हिडीओही जारी केला आहे, ज्यामध्ये संधारमधील शहीद चौकात पोहोचल्याचा दावा केला आहे. भास्करसोबत झालेल्या चर्चेत तालिबानने अनेक प्रमुख राजधान्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे, परंतु आम्ही या दाव्यांची पुष्टी करू शकत नाही. दरम्यान तालिबानचे लढवय्ये गुरुवारी वेगाने पुढे सरकले आहेत.

तालिबानने आतापर्यंत कंधार, हेरात, गझनी, कुंदुज, तकहर, बदख्शन, समनगन, निमरुझ, फराह, जब्जजान, बगलान आणि सार-ए-पुल प्रांत ताब्यात घेतले आहेत. प्रमुख शहरांपैकी फक्त मजार-ए-शरीफ आणि काबूलच आता तालिबानच्या नियंत्रणाबाहेर आहे. दुसरीकडे भारताने गुरुवारी पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत अॅडवायजरी जारी केली आहे. यामध्ये असे म्हटले गेले आहे की फ्लाइट बंद होण्याआधी, ताबडतोब भारतीय देशात परतण्याची व्यवस्था करा. भारतीय कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवावे. कव्हरेजसाठी आलेल्या भारतीय पत्रकारांनीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करावी, असेही म्हटले आहे. यापूर्वी भारतीय दूतावासाने 29 जून, 24 जुलै आणि 10 ऑगस्ट रोजी अॅडवायजरी जारी केली होती.

काबूलमधील भारतीय दूतावासाने गुरुवारी सांगितले की, तीन भारतीय अभियंत्यांना तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागातून एअरलिफ्ट करण्यात आले आहे. भारताने अफगाणिस्तानात शांतता हवी असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, काबूलमधील भारतीय दूतावास बंद होणार नाही. परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात असल्याचेही ते म्हणाले.

अफगाणिस्तानने तालिबानला सत्तेमध्ये हिस्सेदारीची ऑफर दिली
तालिबानची पकड घट्ट होत असण्या दरम्यान अफगाणिस्तान सरकारने हिंसा थांबवण्यासाठी तालिबानला सत्तेत वाटा देण्याची ऑफर दिली आहे. तालिबानने मात्र राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या सरकारशी बोलणी करण्यास नकार दिला. त्याचवेळी, अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी गझनीचे राज्यपाल दाऊद लघमानी, नायब राज्यपाल आणि कार्यालय संचालकांसह काही अधिकाऱ्यांना पकडले आहे. त्यांना वरदक प्रांतातून अटक करण्यात आली आहे.

अमेरिकेने तालिबानला सांगितले - आमच्या दूतावासावर हल्ला करू नका
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची पकड मजबूत होत आहे. इतकी मजबूत की जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेलाही वाटाघाटी करावी लागत आहे. तालिबानला राजधानी काबूल काबीज करायला 90 दिवस लागतील असा अमेरिकेचा अंदाज होता. इतक्या दिवसात अमेरिका आपल्या नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना देशाबाहेर नेईल, पण अमेरिकेचा अंदाज चुकीचा निघाला.

अमेरिकेने आपल्या नागरिकांना त्वरित अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या वार्ताहरांनी तालिबानला सांगितले आहे की त्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतल्यास त्याच्या दूतावासावर हल्ला करू नका. त्याच वेळी, असे म्हटले गेले आहे की त्याच्या नागरिकांना आणि दूतावासाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही हानी पोहोचवू नये. अमेरिकेचे मुख्य राजदूत जाल्मय खलीलजाद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानशी चर्चा सुरू आहे.

अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा - तालिबानला आश्रय देऊ नका
अमेरिकेने पाकिस्तानला अफगाण सीमेवर तालिबानवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तालिबानला आपल्या भागात आश्रय घेऊ देऊ नका. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, अमेरिका फक्त अफगाणिस्तानविरुद्धच्या लढ्यात आमचा वापर करू इच्छित आहे.

बातम्या आणखी आहेत...