आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban । Turkey Russia । Pakistan Iran । Qatar China । Government Formation । Taliban News In Hindi । Taliban News And Live Updates

तालिबान सरकारची तयारी:अफगाणिस्तान सरकार स्थापनेच्या समारंभात सहभागी होणार 6 देश, पाकिस्तान आणि इराणला निमंत्रण

काबूल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प सरकारच्या काळात भारत-अमेरिका संबंधात सुधार

अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेवरुन संघर्ष सुरु आहे. परंतु, लवकरच अफगाणिस्तानात नवीन सरकारची घोषणा केली जाऊ शकते. कारण सोमवारपर्यंत सरकार स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. विशेष म्हणजे सरकार स्थापन करण्यापूर्वीच तालिबानने समारंभासाठी 6 देशांना निमंत्रण पाठवले आहेत. यामध्ये तुर्की, चीन, रशिया, इराण, पाकिस्तान आणि कतार देशांचा समावेश आहे. त्यामुळे सदरील देशातील राष्ट्रपती आणि पंतप्रधान तालिबानच्या नवीन सरकारच्या समारंभात उपस्थित राहतील.

तर दुसरीकडे, तालिबानने निवडक देशांना निमंत्रणे पाठवली आहेत. ज्या देशांशी तालिबानचे चांगले संबंध आहेत, अशाच देशांना त्यांनी निमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये रशिया आणि चीनचा समावेश आहे. कारण अमेरिका या दोन्ही देशांना स्वत:साठी आव्हान मानतो. त्यामुळे तालिबानच्या रणनीतीवर अनेक जाणकार चिंता व्यक्त करत आहे.

ट्रम्प सरकारच्या काळात भारत-अमेरिका संबंधात सुधार
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि भारत यांचे अंतर्गत संबंध चांगले सुधारले होते. तर दुसरीकडे, पाकिस्तानसोबत अमेरिकेचे संबंध मोठ्या प्रमाणात बिघडले होते. अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे चीन आणि रशियासोबतचे शीतयुद्ध सुरूच आहे.

परंतु, एकीकडे तालिबानने दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवण्याची आशा व्यक्त केली आहे. कारण विद्यमान राष्ट्रपती जो बायडन यांचे तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांच्याशी देखील फारसे चांगले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अमेरिकेसह भारतावरही याचा काही परिणाम होईल का? याबाबत तज्ञ भीती व्यक्त करत आहे.

बातम्या आणखी आहेत...