आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:तालिबान्यांच्या आणखी एका करामतीचा व्हिडिओ व्हायरल, तालिबानी चक्क विमानाच्या पंखाला दोरी बांधून घेतायेत झोका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तालिबानी विमानाच्या पंखाला दोरी बांधून झोका झोका खेळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे विमान हे अमेरिकेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी देखील तालिबान्यांचे असेच काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. व्यायामशाळा, गार्डन तसेच इतर अनेक ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तालिबानमध्ये सुरु असलेला हिंसाचार हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. राशिया, अमेरिका, चीन तसेच भारत हे महत्त्वाचे देश तालिबानच्या कारभारावर वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबान्यांचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...