आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी म्हटले की, आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय चेन स्टोअर्स उघडण्यासाठी चर्चा करत आहोत.
बुधवारी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करताना पुतीन म्हणाले की, रशिया आणि ब्रिक्स देशांतील व्यावसायिक विश्वात संपर्क वाढत आहे. आम्ही चिनी कार, उपकरणे आणि हार्डवेअरचा वाटा वाढवण्यासाठीही चर्चा करत आहोत. चीनच्या यजमानपदात झालेल्या या व्हर्च्युअल कार्यक्रमात पुतीन म्हणाले की, चीन आणि भारताला केलेल्या रशियाच्या तेलाच्या निर्यातीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. युक्रेन युद्ध सुरू होण्याआधी फेब्रुवारीत भारत दररोज रशियाकडून ३० हजार बॅरल कच्चे इंधन खरेदी करत होता आणि जूनध्ये हा आकडा दररोज १० लाख बॅरलपर्यंत पोहोचला आहे. तो युरोप रशियाकडून करत असलेल्या आयातीच्या एक चतुर्थांश पट आहे. या मीटिंगमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.