आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुरोप दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कला पोहोचले. त्यांनी पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यासमवेत द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा केली. त्यात दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक करारांवर एकमत झाले. यानंतर माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भारत-युरोपियन मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी लवकरच पूर्णत्वास जातील, अशी आशा व्यक्त केली. यासंदर्भातील चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत एक वर्षापूर्वी एकमत झाले होते.
डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा
मोदी आणि फ्रेडरिक्सन यांनी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या प्रगतीवर चर्चा केली. मोदी यांनी सांगितले की, हरित ऊर्जा, शिपिंग, पोर्ट आणि पाणी व्यवस्थापनात आम्ही प्रगती केली आहे. २०० हून जास्त डॅनिश कंपन्या भारतात पवन ऊर्जा, शिपिंग, कन्सल्टन्सी, फूड प्रोसेसिंग, इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना भारतात व्यवसाय सुलभता आणि आर्थिक सुधारणांचा लाभ मिळत आहे. डॅनिश कंपन्यांसाठी भारतात गुंतवणुकीच्या संधी आहेत.
युक्रेनमध्ये लगेचच युद्धबंदी हवी
दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. युक्रेनमध्ये लगेचच युद्धबंदी व्हावी तसेच चर्चा आणि मुत्सद्देगिरीतून शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. दुसरीकडे, युद्ध रोखण्यासाठी भारत रशियावरील आपल्या प्रभावाचा वापर करेल, अशी आशा फ्रेडरिक्सन यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.