आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातश्नुवा आनन शिशिर बांगलादेशातील पारंपरिक मुस्लिम कुटुंबात वाढत असताना तिच्या वर्तनावरून तिची टिंगल केली जायची. अनेकदा तिला मनोरुग्णही म्हटले जात हाेते. नुकतेच ढाक्यामध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, या वर्तनातून मलाही प्रश्न पडायचा की, मी कोण आहे? मी पुरुषाचे शरीर घेऊन जन्मास आले, मात्र मेंदू एका महिलेसारखा होता. मात्र, मी इथपर्यंत पोहोचून सिद्ध करून दाखवले की समाजात आमचेही अस्तित्व आहे.
२९ वर्षांची तश्नुवा बांगलादेशातील पहिली ट्रान्सजेंडर अँकर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप परिश्रम घ्यावे लागले. वाईट बोलणे ऐकले, वाईट वागणूकही सहन केली. तिच्या कुटुंबाबद्दलही खूपच वाईट बोलले जात होते. मात्र, २०२१ मध्ये केवळ तीन मिनिटांत तिचे आयुष्य बदलले. तिला बांगलादेशातील खासगी वाहिनी बोईशाखी टीव्हीने नोकरी दिली आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ती पहिल्यांदाच एक वृत्तनिवेदक म्हणून जगासमोर आली. यामुळे ती बांगलादेशातील पहिली ट्रान्सजेंडर अँकर झाली आहे. बांगलादेशातील ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल लिहिणारे ह्यूमन राइट्स वॉचचे वरिष्ठ संशोधक कायले नाइट सांगतात की, या समुदायातील एका खूप वेळा दिसणाऱ्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला समोर आणणे महत्त्वाचा संकेत आहे. सामान्यत: हा समुदाय खूप शांत असतो आणि आता त्यांना अधिकृतपणे ओळख प्राप्त झाली आहे. या एका पावलामुळे खूप आशा वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.