आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मुलास इतरांचा सन्मान करणे शिकवा, स्वत:ला श्रेष्ठ मानणे ही समस्या

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असा विचार आपली मुले मनात आणतात का हे जाणून घेण्याचे काम पालकांचे आहे. तसा विचार मुलांच्या मनात येणार नाही याची काळजीही पालकांनी वेळीच घेतली पाहिजे. तो बढाईखोर वृत्तीचा होऊ शकतो. अनेकदा अशी मुले बढाईखोर मुलांना नाइलाजाने साथ देतात. म्हणूनच आई-वडिलांनी मुलांना इतरांच्या दृष्टिकोनाचा आदर करायला शिकवले पाहिजे. तसे झाल्यास अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतील. आई-वडिलांनी मुलांना केवळ शाळेत काय शिकवले? काय खाल्ले? एवढेच प्रश्न विचारू नयेत. सगळी मुले सोबत खेळतात का? असे प्रश्नही विचारायला हवेत. मनोचिकित्सक व लेखिका स्टेला आेम्ली यांनी ‘बुलीप्रूफ किड्स’मध्ये यासंबंधी आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. पॅरेंटिगबद्दलची त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. . अशी मुले शक्तिशाली बनतात. परंतु त्यांनी सहानुभूती शिकण्याची गरज असते.

त्रस्त लोकांना मदत करणारे असतात अपस्टेंडर्स
आेम्ली आपल्या पुस्तकात अपस्टेंडर्सविषयी सांगतात. बढाईखोर अनेकदा दुबळ्यांना छळतात. अशा वेळी दुबळ्यांना साथ देणाऱ्यांना अपस्टेंडर्स म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...