आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे गुड रीड:समस्यांवरील तोडगा शोधण्यावर फोकस करण्यासाठी आयुष्यही सार्थकी लावण्याचे धडे देत आहेत हे शिक्षक

मंडे गुड रीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘टाइम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने अमेरिकेत २०२२ च्या १० नवोन्मेषी शिक्षकांची यादी जारी केली. विशेष म्हणजे या १० शिक्षकांत भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश आहे. हे सर्वजण शिक्षण क्षेत्रात नवोन्मेषी पद्धतीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना जागरूक करत आहेत. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत...

हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करणे विद्यार्थ्यांना शिकवले
‘मला हवामान बदलाविरोधात लढण्यासाठी मियावाकी वन तंत्रज्ञानाबाबतचा मेसेज मिळाला होता. दोन दशकांत कॅलिफोर्नियातील २६.५ कोटी हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. मी विद्यार्थ्यांशी यावर चर्चा केली.जगभरात मियावाकी वन क्षेत्र निर्माण करणाऱ्या एसयूजीआय प्रकल्पातून निधी मिळाला आणि विद्यार्थी कामाला लागले. मियावाकी सामान्य जंगलाच्या तुलनेत वेगाने वाढते आणि जास्त कार्बन शोषून घेते. आज तीन स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये ३३०० रोपे बहरली आहेत. मी विद्यार्थ्यांची स्पेशल ग्रीन टीम बनवली आहे. प्रश्नांवर तोडगा काढण्याची मानसिकता तयार व्हावी यासाठी मी श्वसनाच्या व्यायामाने वर्गाची सुरुवात करते.’ - नीलम (बर्कले)

संशोधनासाठी निधी कसा जमा करायचा हे विद्यार्थ्यांना सांगितले
‘भारतातील आसाममध्ये शाळेत शिकताना मी अनेक प्रश्न विचारत असे आणि एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करून पाहत असे. आता विद्यार्थ्यांची जिज्ञासा अशीच पूर्ण करण्याची इच्छा आहे. चँडलर प्रॅप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत २०१८ पासून विद्यमान समस्यांवर तोडगा काढणे सुरू केले. त्यांनी त्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग, सध्याच्या पेटंटवर संशोधन, नव्या उत्पादनांच्या प्रोटोटाइपसाठी मदत घेण्याचे धडे घेतले. विद्यार्थ्यांनी डेड झोनमध्ये वायफाय सिग्नल वाढवणारे उपकरण आणि हीट स्ट्रेस मोजणारी टोपी बनवली आहे. वर्षअखेरपर्यंत ते गुंतवणूकदारांसोबत प्रोटोटाइप पिच करतील.’ -रचना (अॅरिझोना)

१५० देशांच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शिक्षकांशी जोडले
मी १५० देशांतील विद्यार्थ्यांना विमानात न बसवता शिक्षकांशी जोडले. ६० देशांत भ्रमंती केली आहे. विविध भाषांची जाण आहे, त्यामुळे सहजपणे हे काम करू शकलो. अनेक भाषा बोलणाऱ्या १२०० लोकांच्या नेटवर्कशी विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे जोडण्याची माझी इच्छा आहे. मीअमेरिकेत न्यूक्लिअर इंजीनिअरिंगमध्ये पदवी घेतली. २०१८ मध्ये एका विमान अपघातात जुळा भाऊ आनंदचा मृत्यू झाला. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हॅपी वर्ल्ड फाउंडेशन सुरू केले. गेल्या वर्षी मी असे ३० हजार कॉल अरेंज करून दिले.’
-आकाश (डलास)

बातम्या आणखी आहेत...