आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Teacher's Daughter Liz Truss Is Britain's New Prime Minister, Making Britain The 19th Country In The World To Be Led By A Woman

ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान:शिक्षक कन्या लिज ट्रस यांची वर्णी, महिलेच्या नेतृत्वाखाली ब्रिटन जगातील 19 वा देश

लंडन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकदिनी सोमवारी ब्रिटनला नवीन पंतप्रधान मिळेल. ४६ वर्षीय लिज ट्रस यांचे पंतप्रधान बनणे निश्चित झाले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भारतवंशीय ४२ वर्षीय ऋषी सुनक यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता निकालाची घोषणा होईल. शिक्षक पिता आणि परिचारिका मातेच्या कन्या लिज ट्रस राजकारणात येण्याआधी अकाउंटंट होत्या. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा यांच्यानंतर लिज ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. सध्या १८ देशांचे नेतृत्व महिला करत आहेत. त्या १५ देशांत पंतप्रधान, ३ देशांत राष्ट्रपती आहेत.

लिज ट्रस अशा राहिल्या पुढे
- स्पर्धेत सर्वात शेवटी सहभागी झाल्या, मात्र दिवसेंदिवस त्या वेगवान, हुशार सिद्ध होत गेल्या.
-सततच्या राजीनाम्यांनतरही लिज बोरिस यांच्या बाजूने राहिल्या.
-आयकरात १.२५% कपात करण्याचे आश्वासन ट्रस यांनी दिले आहे. कॉर्पोरेशन टॅक्स मागे घेण्याचेही आश्वासन दिले आहे.
-रशिया-युक्रेन युद्धाबाबत स्पष्ट भूमिका. युद्धासाठी व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार ठरवण्यात यशस्वी.

विदेशमंत्री होत्या लिज, भारत-ब्रिटन संबंध चांगलेच राहतील
सुनक यांच्याऐवजी लिज पंतप्रधान बनणे भारतासाठी फायदेशीर ठरेल. लिज विदेशमंत्री हेत्या. दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेण्यास साह्यकारी ठरल्या आहेत. यामुळे संबंध चांगलेच राहतील अशी अपेक्षा आहे. अलीकडच्या वर्षांतील पंतप्रधानांनी भारताकडे लक्ष दिले आहे.

... आणि सुनक असे पिछाडीवर
-उत्कृष्ट वक्ते, मात्र आर्थिक संकटाला सामोरे जाण्याचा संतुलित दृष्टिकोन आवडला नाही. श्रीमंत टेक्नोक्रॅट अशी प्रतिमा महागात.
-बॉस, मेंटर बेरिस जॉन्सन पदावरून दूर सारण्यासाठी पदाचा त्याग केला. ही कृती पाठीत खंजीर खुपसणे समजली गेली.
- प्रचारात वंचित शहरी भागांतून पैसे घेतल्याचे मान्य करणारा व्हिडिओ समोर.
-संडे टाइम्सने पत्नी अक्षता यांना महाराणीपेक्षा श्रीमंत दाखवले. हे अडचणीचे ठरले.

बातम्या आणखी आहेत...