आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जपानमध्ये ‘टीचिंग बाय वॉचिंग’चा ट्रेंड, मुलांच्या भांडणामध्ये मोठ्यांची लुडबुड नसल्यास तोडगा काढण्याची मिळते शिकवण

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिरोशिमा विद्यापीठातील अभ्यासात दावा - मिमामोरू तंत्र इतर देशांसाठीही उपयोगी

शाळेत विद्यार्थ्यांची भांडणे झाल्यास शिक्षक त्यात मध्यस्थी करतात, त्यांना समजावतात.मुलांचा सांभाळ करताना जगभरात हीच पद्धत अवलंबली जाते. जपानच्या शाळांमध्ये सध्या नव्या तंत्राचा वापर केला जातोय तो म्हणजे मुलांच्या भांडणात मोठ्यांनी अिजबात पडायचे नाही. मुलांच्या भांडणावेळी या तंत्राचा वापर करावा. नव्या तंत्रामुळे मुलांना मोकळेपणा मिळतो आणि समस्येवर तोडगा कसा काढावा यासाठीही प्रोत्साहन मिळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या तंत्राला ‘मिमामोरू’ म्हणतात. ‘मिमा’ या अर्थ नजर ठेवणे आणि ‘मोरू’ म्हणजे संरक्षण करणे. यास ‘टीचिंग बाय वॉचिंग’ही म्हटले तर चालेल अर्थात मुलांच्या भांडणावेळी मोठ्यांनी जाणूनबूजून डोळेझाक करणे. त्यामुळे एखाद्या मुद्यावर सहमती नसल्यास स्वत:ची मर्जी सांभाळून निर्णय कसा घ्यावा हे मुलांना कळते.

हिरोशिमा विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये मुलांमधील भांडणे सोडवण्याची ही पद्धत खूपच उपयोगी ठरल्याचे दिसून आले. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र तज्ज्ञ फुमिनोरी नाकात्सुबो यांनी सांगितले की या संशोधनात अमेरिकी आणि जपानी शिक्षकांनाही सहभागी करुन घेतले होते. मुलांच्या भांडणात जपानी शिक्षक का पडत नाही आणि त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेतले असता या भांडणामुळे मुलांना चांगल्या-वाईट यामधील फरक ओळखण्याची क्षमता विकसित होते, निर्णयक्षमता वाढते, तसचे समस्यांमधून मार्ग कसा काढावा याचीही शिकवण मिळते असे ‘मिमामोरू’ पद्धतीत दिसून आले. या तंत्रामध्ये थोडाफार बदल करून ती लागू केल्यास केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातील देशांमधील मुलांना ही पद्धत फायदेशीर ठरू शकते, असे अमेरिकी शिक्षकांचे मत आहे.

मुलांच्या सुरक्षेला स‌र्वोच्च प्राधान्य, त्याकडे दुर्लक्ष नको
भांडणे संपल्यावर असे करावयास नको होते,आपली समस्या सोडवण्यासाठी भांडण हा मार्ग नाही हे त्यांना कळते, असे अभ्यासात दिसून आले. अर्थात हस्तक्षेप नाही म्हणजे मुलांच्या सुरक्षकडे दुर्लक्ष करणे असाही नाही. फायदा होणार असेल तरच ही जोखीम उचलावी. ‘ मिमामोरू’ची तीन वैशिष्ट्ये आहेत. जोखीम कमी करण्यासाठी कमी दखल देणे, मोठ्यांच्या मदतीविना भांडणे सोडवणे आणि तोडगा काढण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देणे.यामुळे मुलांना जबाबदारीचीही जाणीव होते.

बातम्या आणखी आहेत...