आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिलिकॉन व्हॅलीबाबत आयटी कंपन्यांचा अपेक्षाभंग होत आहे. टेक दिग्गज कंपन्या टेस्ला, ओरॅकेल, हेवलेट पॅकर्ड सारख्या अनेक कंपन्या आणि त्यांचे कार्यकारी टेक्सासला स्थायिक होत आहेत. यातील काही कंपन्यांनी सांगितले की, अवघड टॅक्स प्रक्रिया, अनावश्यक नियमांमुळे कॅलिफोर्निया सोडत आहोत. तसेच येथे राहणेही महागडे आहे. येथील राहणीमान मूल्य देशाच्या सरासरीपेक्षा ५०% जास्त आहे. यामुळे दोन वर्षांत १३ हजार कंपन्यांनी कॅलिफोर्निया सोडले आहे. याबाबत आर्थिक विश्लेषक डॅन इव्हेस सांगतात, पलायन असेच सुरू राहिले तर लवकरच टेक्सास नवीन सिलिकॉन व्हॅली असेल. ते म्हणतात, टेक्सासमध्ये राहणे स्वस्त आहे. फक्त यातूनच फर्मच्या खर्चात ३०% घट होते. तसेच टेक्सासचे सिलिकॉन हिल्स या कंपन्यांना अर्धी गुंतवणूक आणि खर्चात सिलिकॉन व्हॅलीचा अनुभव देते.
येथे अॅमेझॉन, अॅपल, सिसको, ईबे, फेसबुक, गुगल, आयबीएम, इंटेल, पे पाल, प्रोकोर, सिलिकॉन लॅब्स, डेल सारख्या कंपन्या आधीपासूनच येथे आहेत. एवढेच नव्हे तर टेक कंपन्यांचे मालकही टेक्सासच्या ऑस्टिन, ह्यूस्टन आणि मियामित स्थायिक होत आहेत. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ईलोन मस्क यांनी ऑस्टिनमध्ये वास्तव्य केले आहे. मियामी सिलिकॉन व्हॅलीतून पलायनासाठी मुख्य ठिकाण झाले आहे. शटरस्टॉकचे संस्थापक जोनाथन ओरिंगर, कीथ राबाइस आणि डेव्हिड ब्लूमबर्ग सारखे उद्योगपती मियामीत राहतात.
महापौर फ्रान्सिस सुआरेज सांगतात की, त्यांची इलोन मस्क, ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी, गुगलचे माजी सीईओ एरिक श्मिटसारख्यांशी चर्चा झाली आहे. सर्व मियामीत यायला उत्सुक आहेत. आम्ही या कंपन्यांना लालफितीतून मुक्ती देण्यासाठी आयटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहोत. सध्या कॅलिफोर्नियाच्या लोकसंख्येत आणि नोकरीतील वाढ दोघांचा वेग मंदावला आहे. कोरोनामुळे घरूनच काम करण्याची सूट मिळाल्याने सुमारे १.३५ लाख लोकांनी कॅलिफोर्निया सोडले आहे. लिंक्डइन डेटानुसार सिलिकॉन व्हॅलीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ३५% घट झाली आहे.
३५% भारतीय कुटुंबांनी सोडले कॅलिफोर्नया
कॅलिफोर्नियात राहणारी समिरा सांगते की, दीर्घकाळ कॅलिफोर्नियात राहणे खूप अवघड आहे. तिच्यानुसार ३५% भारतीय कुटुंबांनी गेल्या वर्षी कॅलिफोर्निया सोडले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.