आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारू ज्या देशाच्या संस्कृतीचा भाग होती त्या देशाची तरुण पिढी आता दारुपासून दूर जात आहे. ‘मॉनिटरिंग द फ्यूचर रिपोर्ट’ नुसार, अमेरिकेत प्रथमच ६०% किशोरवयीन मुलांनी दारुला अद्याप हातही लावलेला नाही. डिसेंबर आणि जानेवारीतील जल्लोषाच्या वातावरणातही किशोरवयीन मुले दारु पिताना दिसले नाहीत. साधारणत: किशोरवयीन मुलांना मित्रांच्या ग्रुपमधून दारुची सवय लागते. मात्र, बाहेर सोबत फिरताना, थँक्सगिव्हिंग पार्टी, ख्रिसमस किंवा नववर्षाची पार्टी असो, अमेरिकन किशोरवयीन आता मित्रांसोबतही शीतपेये पीत आहेत. वस्तुत: अमेरिकेत सोबर मंथ व सोबर ईयरचा ट्रेंड सुरू आहे. सोबर ऑक्टोबर व ड्राय जानेवारी हे अमेरिकेत सामान्य शब्द झाले आहेत. यात लोक दारु सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. महिना किंवा वर्षभर दारु न पिण्याची शपथ घेत आहेत. अमेरिकेमध्ये प्रत्येकी १ लाखापैकी १३ मृत्यू दारुमुळे होतात. कोरोना महामारीपूर्वीच्या पहिल्या वर्षातच दारुमुळे अमेरिकेत ३० टक्क्यांनी मृत्यू वाढले. महामारीनंतर अमेरिकेत आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. कंपन्यांनी अल्कोहोल नसलेली अनेक नवीन पेये बाजारात आणली आहेत.
डिस्टिल्ड स्पीरिट्स कौन्सिल ऑफ द यूनायटेड स्टेट्स अँड फाउंडेशन फॉर अॅडव्हान्सिंग अल्कोहोल रिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष व सीईओ ख्रिस स्वॉन्गर म्हणतात, अमेरिकेत वाढती गुन्हेगारी आणि अपघातांचे एक कारण दारु आहे. तरुणांना दारुपासून दूर ठेवणे समाजाची जबाबदारी आहे. अमेरिकेत दारु खरेदी करण्याचे किमान कायदेशीर वय २१ वर्षे आहे. स्वॉन्गर सांगतात, कमीत कमी आपण दारु खरेदी करण्याच्या किमान वयापर्यंत तरी मुलांना दारु पिण्यापासून रोखू शकतो. इथे ‘वी डोन्ट सर्व्ह टीन्स’ अभियान राबवले जात आहे. स्वॉन्गर म्हणतात, १३ ते १७ वर्षे वयोगटातील मुले दारु पिण्याचे किंवा न पिण्याचे सर्वात मोठे कारण त्यांचे आई-वडीलच आहेत. या बाबतीत ते आल्या मुलांसाठी सर्वात मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आहेत.
अमेरिकेमध्ये प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींनी दारू सोडल्याने तरुणही प्रेरित अमेरिकेत हॉलीवूड अभिनेत्यांपासून ते गायक आणि उद्योगपतींनी दारू सोडत असल्याचे सांगितले. त्यांनी सार्वजनिक बैठकांत किंवा आपल्या सोशल मीडिया खात्यावर याबाबत वक्तव्य केले. यामुळे त्यांच्या किशोरवयीन व तरुण चाहत्यांत दारु सोडण्याची क्रेझ वाढली आहे. गायक आणि गीतकार मार्गो प्राइस यांनी दारु सोडली आणि म्हणाले, आता आयुष्य सोपे झाले आहे. मला आधीपेक्षा खूप बरे वाटत आहे. आपल्या मुलांची काळजीदेखील घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.