आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्हिडिओ पाहून स्वत:ला आजारी समजतात किशोरवयीन, सोशल मीडियावरच शोधत आहेत उपचार

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सध्या मानसिक आजार व त्यांच्या लक्षणांची माहिती देणाऱ्यांचा पूर आला आहे. तथाकथित तज्ज्ञ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याबाबत सांगतात. मात्र, किशोरवयीन मुला-मुलींसाठी ही मोठी समस्या बनली आहे. ते सोशल मीडियातील रील, व्हिडिओ पाहून स्वत:ला आजारी समजत आहेत.

सोशल मीडियातील प्रभावशालींचे व्हिडिओ पाहून स्वत:मध्ये तशी लक्षणे शोधत आहेत. ऑनलाइनच आजाराचे निदान केल्यानंतर त्यावरील उपचारासाठीही याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्हिडिओ व रील पाहत-ऐकत आहेत. अमेरिकेच्या मानसोपचारतज्ज्ञ अॅनी बार्क सांगतात, वस्तुत: हे किशोरवयीन नेहमीच आजारी होत नाहीत. फक्त रील व व्हिडिओत सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे स्वत:ला आजारी मानतात. ते सोशल मीडियाच्या विळख्यात इतके गुरफटले आहेत की, आपल्या आजाराचे नावही स्वत:च सांगतात. ते मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याऐवजी उपचारासाठी सोशल मीडियाच्या तथाकथित तज्ज्ञांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे समस्या आणखी वाढते. व्हिडिओत सांगितल्या जाणाऱ्या पद्धतींवर विश्वास ठेवून त्यांचा अवलंब करतात. बार्क सांगतात, अनेकदा समान लक्षणे असतानाही एका व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो, पण दुसऱ्याला नाही. हे वयावर अवलंबून असते. जसे समान लक्षण असलेला किशोरवयीन मानसिकरीत्या फिट असू शकतो, तर वृद्ध मानसिकदृष्ट्या आजारी असू शकतो. जणू आपल्या आजारापेक्षा सोशल मीडियातील प्रभावशालींच्या तावडीतून बाहेर निघणे कठीण जात आहे, असे त्यांना वाटते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे मिक प्रिन्स्टन सांगतात, आपला मानसिक आजार लोकांना माहीत व्हावा असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे किशोरवयीन आपल्या लक्षणांच्या आधारे सोशल मीडियावरच आपल्या आजाराबाबत जाणून घेतात. वस्तुत: टिकटॉकपासून फेसबुक, इन्स्टाग्रामचा अल्गोरिदमच असा आहे की, तुम्ही जे शोधता त्यानुसारच कंटेंट येत राहतो. अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष अनीश दुबे म्हणतात, मुलगा सोशल मीडियावरील व्हिडिओबाबत सांगत असेल तर त्याचे ऐकावे.

तात्कालिक समस्यांच्या दबावालाच समजतात मानसिक आजार डॉ. प्रिन्स्टन सांगतात, मुले आपल्या एखाद्या तात्कालिक समस्येतून झालेल्या तणावालाच मानसिक आजार समजतात. आजार ऑनलाइन सर्च करण्याचे कारण म्हणजे घरातही एखाद्या ज्येष्ठाकडे त्यांचे एेकण्यासाठी वेळ नाही. सोशल मीडियात हॅशटॅग मेंटलहेल्थवरील १०० व्हिडिओ १०० कोटींहून अधिक वेळा पाहिल्याचे मार्चमधील एका संशोधनात आढळले.

बातम्या आणखी आहेत...