आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक संकटात सापडलेल्या पाकला तहरीक-ए-तालिबान अर्थात TTP कडून कडवे आव्हान मिळत आहे. टीटीपीने येथे सातत्याने हल्ले करून पाकपुढील आव्हानांत वाढ केली आहे.
आता टीटीपीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात पाक संसद व एका व्यक्तीच्या हातात कागदाचा तुकडा दिसत आहे. त्यावर इंग्रजी व उर्दुत आम्ही येत आहोत, असा संदेश लिहिला आहे. यावेळी हा व्यक्ती संसदेकडे इशारा करताना दिसून आहे.
व्हिडिओ बनवणारा जेरबंद
यासंबंधीच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ इस्लामाबादच्या मारगल्ला हिल्सवर तयार करण्यात आला आहे. व्हिडिओत व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. पण पाकच्या डॉन न्यूज वेबसाइटने पोलिसांनी हा व्हिडिओ तयार करणाऱ्याला अटक केल्याचा दावा केला आहे.
खैबर पख्तुंख्वात TTPचे 10 हजारांवर अतिरेकी
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली आहे. यामुळे टीटीपीला मोठी ताकद मिळाली आहे. पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह डॉनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले की, अफगाणिस्तानला लागू असणाऱ्या खैबर पख्तुंख्वामध्ये टीटीपीचे 7 ते 10 हजार अतिरेकी दडलेले आहेत. यातील काही अतिरेक्यांनी टीटीपीचे काम सोडले होते. पण गत काही दिवसांत ते पुन्हा सक्रीय झालेत.
सनाउल्लाह असेही म्हणाले की, या अतिरेक्यांना त्यांच्या 25 हजार कुटुंबीयांचीही साथ मिळत आहे. तसेच काही स्थानिकही या अतिरेक्यांच्या मदतीने खंडणी उकळत आहेत. ब्लॅकमेल करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.