आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:मुलांना सांगा.. ऑनलाइन वर्ल्डमध्ये दुसऱ्यांशी तुलना करू नका, चुकीची माहिती ओळखा, ट्रोलिंगपासून सावध राहा

वॉशिंग्टन | दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या सोशल मीडिया एक्सपोजरबद्दल पालकांना चिंता असते. त्यांना समजावणे आव्हानात्मक असते. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने पहिल्यांदा मुलांच्या सोशल मीडिया वापराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ‘सोशल मीडियाबद्दल मुलांना कसे शिकवायचे’ या शीर्षकातील या मार्गदर्शक तत्त्वातील काही उतारे जाणून घ्या:

स्वत: आदर्श ठरा : हेल्दी डिव्हाइस मॅनेजमेंटचे नॅशनल अॅडव्हायझर डॉन ग्रांट म्हणाले की, मुलांना सोशल मीडियाचा मर्यादित वापर, ऑनलाइन द्वेष आणि ट्रोलिंग यासारख्या गोष्टींची जाणीव करून द्या. सामायिक कौटुंबिक मूल्यांवर चर्चा करा आणि ही गुणवत्ता ऑनलाइन कशी व्यक्त केली जाऊ शकते ते दर्शवा. किशोरवयीन मुलांसाठी निरोगी वर्तन आणि सवयींचे पालन करणे कठीण आहे. त्यामुळे त्याला एकट्याने काही करू देऊ नका. शाळेतील मित्र आणि जवळच्या लोकांची एक सपोर्ट सिस्टिम तयार करा, जी त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतील.

जोखमांबाबत सांगा
मुलांना सोशल मीडियावर येण्यापूर्वी चुकीची माहिती, गुंडगिरी आणि द्वेषयुक्त भाषण यासारख्या ऑनलाइन धोक्यांबद्दल चेतावणी द्या. ग्रँट म्हणतात की हे आमच्या पिढीला उपलब्ध नव्हते, परंतु आजकाल पालक मुलांना सर्व काही आगाऊ शिकवू शकतात. आपल्या चर्चेत चुकीची माहिती ओळखणे, आपली तुलना दुसऱ्यांच्या ऑनलाइन व्यक्तिमत्त्वाशी करणे यासारख्या विषयांचा समावेश केला जावा.

सकारात्मक अनुभवांचे कौतुक करा
सोशल मीडिया किशोरवयीन मुलांना व्यक्त होण्याची संधी देते. मुलांना निरोगी सवयी जपण्यात मदत करताना सोशल मीडियावर त्यांच्या सकारात्मक अनुभवांची प्रशंसा करा. ते गरजेपेक्षा यावर अधिक वेळ तर देत नाहीत ना, याकडे लक्ष द्या. ते जेव्हा एखादी पोस्ट करतात तेव्हा त्यांना यामागील उद्देश काय, हे विचारा. तुम्ही लोकांना काय आणि का सांगू पाहताय? या कृतीमुळे मुलांच्या चुकीच्या सहवासाची उदाहरणे शोधणे सोपे होईल.

स्क्रोल करताना मुले तणावात दिसल्यास बोला
१० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. स्क्रोल करताना मूल तणावग्रस्त किंवा अस्वस्थ वाटत असल्यास दुर्लक्ष करू नका. त्याला विचारा की एखादा प्लॅटफॉर्म त्याला वाईट वाटत आहे का?