आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Temperature At 53 Degrees In Death Valley, The Hottest California In The World; Fear Of Temperatures Reaching 60 Degrees If Emissions Are Not Reduced

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात उष्ण कॅलिफोर्नियातील ‘डेथ व्हॅली’त पारा 53.30 अंशांवर; उत्सर्जन घटले नाही तर तापमान 60 अंशांवर जाण्याची भीती

कॅलिफाेर्निया2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • द. अमेरिकी राज्यांत 5 कोटी लोकांना उष्णता-झळांपासून सावधगिरीचा इशारा
  • द. अमेरिकेतील राज्यांमध्ये सरासरी तापमान 2 अंशांनी वाढले

हवामान बदलाचा परिणाम जगभरात दिसत आहे. अमेरिकेच्या पूर्व कॅलिफोर्नियातील वाळवंट भागात डेथ व्हॅली म्हणजे मृत्यूच्या दरीत रविवारी ५३.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. हे गेल्या तीन वर्षांतील या मोसमात नोंदवण्यात आलेले पृथ्वीचे सर्वाधिक तापमान आहे.

वातावरणात अचानक झालेल्या बदलानंतर अमेरिकेच्या हवामान खात्याने दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्या ५ कोटी लोकांना जास्त उष्णता आणि झळांपासून वाचण्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर कार्बन उत्सर्जन याच वेगाने वाढत राहिले तर २०३० पर्यंत खोऱ्याचे तापमान ६० अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. कॅलिफोर्नियातील हे वाळवंट फ्लोरिडातील पनामा सिटीपर्यंत सुमारे पावणेतीन हजार किमी परिसरात पसरले आहे. येथे परिसरातील बोर्गर, टेक्सास, अॅमारिलो, फोनिक्स, रोझवेल आणि न्यू मेक्सिकोतही तापमान ४० ते ४६ अंशांपर्यंत नोंदवण्यात आले, जे सरासरीपेक्षा २ अंश जास्त आहे. डेथ व्हॅली जगातील सर्वात उष्ण जागा आहे. येथे सामान्य तापमानही ५० अंशापेक्षा जास्त असते. सन १९१३ मध्ये येथील तापमान ५६.७ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते, जे आतापर्यंत सर्वाधिक होते.

अमेरिकेचे हवामान शास्त्रज्ञ ब्रॉयन थॉमसन म्हणाले, डेथ व्हॅलीचे तापमान एवढे वाढण्याची अनेक कारणे आहेत. येथे पाऊस खूप कमी होतो आणि थंडी तर नसतेच. प्रशांत महासागरातील हवा येथे येईपर्यंत त्यातील ओलावा सुकलेला असतो, यामुळे येथे केवळ उष्ण हवाच पोहोचतात. दरीचा पृष्ठभाग असा आहे की सूर्याच्या किरणांनी चमकतो. समुद्रसपाटीपासून जास्त खाली गेल्यावर हवा दाबामुळे गरम होते आणि ही दरी समुद्रसपाटीपासून १९० फूट खाली आहे. याशिवाय एक सर्वात महत्त्वाचे कारण ग्रीन हाऊस वायूचे वाढते उत्सर्जन आहे. त्यामुळे उष्णता वाढण्याचा वेग ६०० पट जास्त झाला आहे. येथे जमिनीवर तापमान आणखी जास्त असते. ही दरी लांब आणि अरुंद आहे, मात्र उंच डोंगरात आहे. रात्रीही येथील तापमान २८ ते ३७ अंशादरम्यान असते.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सैबेरियात जानेवारी ते जून २०२० पर्यंत ५ अंश सेल्सियस तापमान वाढण्यामागे ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन आहे. येथे भडकलेल्या आगीमुळे ११.५ लाख हेक्टर जंगलाचे नुकसान झाले आणि ५.६ कोटी टन उत्सर्जन झाले. आगीच्या ज्वाळांनी येथे वातावरणात राख भरली.

बातम्या आणखी आहेत...