आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:अंटार्क्टिकमध्ये पेंग्विनवर तापमान वाढीचे संकट..

पाॅलेट बेट (अंटार्क्टिका)5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र अंटार्क्टिका येथील पाॅलेट बेटावरील पेंग्विन पक्ष्यांच्या वसाहतीचे आहे. हवामान बदलामुळे जगाच्या इतर भागाच्या तुलनेत पश्चिमेत तापमान वेगाने वाढत आहे. हिमनद्या वितळू लागल्याने एडेली पेंग्विनचे मृत्यू वाढले आहेत. एडेली पेंग्विन प्रजातीची संख्या ३८ लाखांवर आहे. अंटार्क्टिकामध्ये ती सर्वाधिक आहे. पश्चिमेकडील भागाच्या तुलनेत पूर्व भागात अधिवास असलेल्या पेंग्विन यांना कमी धाेका दिसताे. एम्परर पेंग्विन नामशेष हाेत असलेली प्रजात असून त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सरकारने पुढाकार घेतला आहे. लवकरच कार्यवाही हाेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे पक्षी वसाहतींमध्ये वास्तव्य करतात. त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असे अमेरिकेच्या फिश अँड वाइल्ड लाइफने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...