आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिराची तोडफोड:कॅनडामध्ये पुन्हा मंदिराची तोडफोड; भिंतीवर भारताविरोधातील घोषणा

टोरंटो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील ओंटारियो प्रांतात पुन्हा एकदा मंदिराची तोडफोड करण्यात आली. आरोपींनी मंदिराच्या भिंतीवर भारतविरोधी घोषणाही लिहिल्या. ओंटारियोमधील विंडसरच्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात बुधवारी रात्री १२ वाजेदरम्यान ही घटना घडली. कॅनडातील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने घटनेबद्दल संताप व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, या घटनेत सहभागी आरोपींविरोधात कडक कारवाई व्हावी व अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी पावले उचलावीत, असे कॅनडाला स्पष्ट सांगितले आहे.

सीसीटीव्ही फुटेज मिळाले
पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. यात दोन आरोपी मंदिराच्या भिंतीवर घोषणा लिहिताना दिसत आहेत. विंडसर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे.

अमेरिकी वित्त क्षेत्रात १०० सर्वात प्रभावी महिलांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या पाच महिलांचा समावेश