आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 हिंदू शाळांमध्ये 20 हजार विद्यार्थी:20 वर्षांत मंदिरे 435 वरून वाढून 1000, भारतीय सर्वाधिक दाते

अमेरिका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत हिंदू समाजाचा प्रभाव सतत वाढत आहे. गेल्या १५ वर्षांत अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या दुप्पट होऊन सुमारे सव्वा २२ लाख झाली आहे. हिंदू अमेरिकन फाउंडेशननुसार, २०२५ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या सुमारे २८ लाख होईल. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्लुरलिझ्म प्रोजेक्टनुसार, २० वर्षांपूर्वी अमेरिकेत ४३५ मंदिर होते. त्यांची संख्या वाढून सुमारे १००० झाली आहे. मंदिरांची संख्या वाढण्याचे कारण, येथे येऊन स्थायिक होणाऱ्या हिंदूंच्या लोकसंख्येतील वाढ आहे. अमेरिकेत हिंदू धर्म आणि संस्कृतचा वेगाने विस्तार झाला आहे. वॉशिंग्टन डीसीच्या राजधानी मंदिरातील मुख्य पुजारी पंडित राम स्नेह त्रिपाठी यांनी दै.भास्करला सांगितले की, ५ वर्षांत त्यांच्या शाळेत मुलांच्या संख्येत सुमारे २००% वाढ झाली आहे. या आठवड्यात विक्रमी ६०० मुलांनी हिंदू वर्गात प्रवेश घेतला आहे.

सर्वात शिक्षित हिंदू समाज अमेरिकेत स्थलांतरितांमध्ये हिंदू समाज १५.७ वर्षांच्या सरासरी आैपचारिक शिक्षणासह सर्वात शिक्षित आहे. दुसऱ्या क्रमांकावर १४.७ वर्षांच्या सरासरी शिक्षणासह ज्यू आहेत. सरासरी अमेरिकी १२.९ वर्षांचे शिक्षण घेतो. २००७ मध्ये अमेरिकी लोकसंख्येत ०.४% हिंदू होते. सध्या हे ०.७% झाले आहेत. धार्मिक डेटा आर्काइव्हनुसार, ख्रिश्चन, मुस्लिमांनंतर तिसरा सर्वात मोठा धार्मिक समाज आहे.

५.४ कोटी अमेरिकी योग आणि ध्यान करू लागले अमेरिकेत हिंदुंची वाढती संख्या पाहता लोकसंख्येतील बदलापर्यंतच मर्यादीत नाही. हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालात हेही आढळले की, हिंदू अमेरिकी वेगाने राजकीयदृष्ट्या सक्रिय होत आहेत. याशिवाय, अलिकडच्या वर्षांत योग आणि ध्यानच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेत शारीरिक व्यायाम आणि तणावात दिलासा मिळावा यासाठी एक लोकप्रिय माध्यम बनले आहे. अंदाजे ३.६ कोटी अमेरिकी योग करतात आणि १.८ कोटी ध्यान करतात.

हिंदू धर्म आणि संस्कृतीप्रति वाढता कल पाहता आता अमेरिकेतील अनेक शहरांत समर स्कूल सुरू केले आहेत. अमेरिकेत ३१ इस्कॉन मंदिरांच्या शाळांत सुमारे २० हजार मुले आठवडी वर्गांत सहभागी होतात. विशेष म्हणजे,अमेरिकेत जवळपास ४८% हिंदू धार्मिक संस्थांना नियमित पद्धतीने निधी देतात. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, धार्मिक संस्थांना निधी देणाऱ्यांत हिंदू स्थलांतरित सर्वात पुढे आहेत. ते वार्षिक सरासरी सुमारे १६ हजार रु. दान देतात. दानदात्यांची संख्या १० वर्षांत दुप्पट झाली आहे. बाप्सच्या कोषाध्यक्षानुसार प्रत्येक मंदिरास सरासरी २ कोटी डॉलर दान मिळते.