आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैवानमुळे तणाव:अमेरिकी जनरल  म्हणाले, चीनशी 2025 मध्ये युद्ध; ड्रॅगनचा थयथयाट

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी मोबिलिटी कमांड प्रमुखांची मेमोद्वारे शक्यता व्यक्त

तैवान वाद, व्यापारी स्पर्धेमुळे अमेरिका आणि चीनमध्ये कमालीचा तणाव आहे. यादरम्यान, अमेरिकी एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख जनरल माइक मिनिहान म्हणाले की, अमेरिका आणि चीन यांच्यात २०२५ मध्ये युद्ध पेटण्याची शक्यता वाढली आहे. ते म्हणाले, दोन लष्करी शक्ती युद्धात उतरल्याने स्थिती गंभीर होईल. अशात आतापासूनच युद्धाची तयारी केली पाहिजे. वरिष्ठ जनरल यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांना मेमो पाठवला आहे. मिनिहान म्हणाले, माझा अंतरात्मा सांगतो की, २०२५ मध्ये युद्धाच्या मैदानात लढेन. एअर मोबिलिटी कमांडमध्ये १.१ सर्व्हिस मेंबर्स आणि सुमारे ५०० विमाने आहेत. अमेरिकेत एअर मोबिलिटी कमांड परिवहन व इंधन भरणाऱ्या विमानांचा ताफा आणि देखरेखीची जबाबदारी सांभाळते. या मेमोद्वारे प्रशांत क्षेत्रातील दोन्ही किनाऱ्यांवर खळबळ उडाली आहे. मेमोमुळे चीनचा थयथयाट झाला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने मेमो “बेजबाबदार व चिथावणीखोर’ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, चिनी लष्कराती नि. वरिष्ठ कर्नल व सिंघुआ विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्योरिटी अँड स्ट्रॅटजीचे फेलो झोऊ बो यांनी टाइमला सांगितले की, मिनिहानचा अंदाज बेजाबदार आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकी जनरल रणनीतीशिवाय एकही गोळी न चालवता चीनची प्रतिमा व विश्वासाहर्ता धुळीस मिळवू इच्छितात.

दुसरीकडे, सेवानिवृत्त अमेरिकी लेफ्ट. कर्नल डॅनियल एल.डेव्हिस म्हणाले, या इशाऱ्याचा अर्थ आम्हाला माहिती नसलेले खूप काही जनरल जाणून आहेत. किंवा वास्तवात लवकर तयारीसाठी इशारा देत आहेत. हा मेमो निश्चितच असामान्य आहे. दरम्यान, पेंटागॉनचे प्रेस सचिव ब्रिगेडियर जनरल पॅट्रिक राय रायडर म्हणाले, चीन संरक्षण् विभागासाठी आव्हान ठरत आहे आणि आमचे लक्ष शांततापूर्ण, मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत क्षेत्र कायम राखण्यावर आहे.

आधार : तैवान, अमेरिकेत निवडणुकीचा फायदा उचलण्याच्या स्थितीत चीन
अमेरिका आणि चीन २.३ कोटी लोकसंख्येचे स्वशासित बेट तैवानवर संघर्षाच्या स्थितीत आहे. चीन हे क्षेत्र आपले मानतो. यूएस-इंडो -पॅसिफिक कमांडचे माजी प्रमुख फिलिप डेव्हिडसन म्हणाले, चीन २०२७ पर्यंत तैवानवर हल्ला करू शकतो यावर ते ठाम आहेत. मिनिहान यांनी मेमोत नमूद केले की, तैवान आणि अमेरिका दोन्हींमध्ये २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल. अशा स्थितीत चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना तिसरा कार्यकाळ मिळाला आहे. त्यांनी युद्ध परिषद स्थापन केली आहे.

अमेरिकी सदनातही जोरदार चर्चा, नवे स्पीकर नॅन्सींच्या मार्गावर
अमेरिकी रिपब्लिकन हाऊसचे नवे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी म्हणाले की, चीनवर विश्वास ठेवण्याचा काळ संपल्याचे दोन्ही पक्षांचे एकमत आहे. मॅक्कार्थी मावळत्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या वाटेने चालू इच्छितात.

चीन अणुक्षमता वाढवू लागला, अमेरिकी संरक्षण बजेट विक्रमी
{दाेन्ही बाजूने लष्करी शक्ती वाढवली जात आहे. चीन आपली अण्वस्त्रे २०३० पर्यंत १,००० करणार आहे.
{अमेरिकेत या वेळी संरक्षणासाठी तरतूद ७० लाख कोटी रु.च्या विक्रमी स्तरावर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...