आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Tensions In Tibet China Over Next Dalai Lama's Election, China Forms Committee Of Officials To Make Supporter Dalai Lama

बीजिंग:पुढील दलाई लामाच्या निवडीवरून तिबेट-चीनमध्ये तणाव, समर्थकाला दलाई लामा करण्यासाठी चीनने अधिकाऱ्यांची समिती केली स्थापन

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ व्या दलाई लामांनी अद्याप देहत्याग केलेला नाही, तरीही तिबेट आणि चीनदरम्यान पुढील दलाई लामांवरून तणाव सुरू आहे. तर, अमेरिकेने त्यांच्या तिबेट धोरणानुसार म्हटले आहे की, दलाई लामांची निवड तिबेटींद्वारेच व्हायला हवी. दुसरीकडे, चीनला त्याच्या एखाद्या समर्थकाला दलाई लामा बनवायचे आहे. सध्याच्या दलाई लामांमुळेच त्यांची जगात प्रतिमा खराब झाल्याचे त्यांना वाटते. तिबेट संदर्भातील तज्ज्ञ रॉबर्ट बर्नट यांच्यानुसार यंदा जानेवारीत चीनने २५ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. पुढील दलाई लामा निवडण्याची तिची जबाबदारी आहे. निर्वासित बौद्ध लामांचे समर्थन मिळवण्यासाठी चीन सरकार त्यांना आमिष देत आहे. त्यात मोफत चीन प्रवास, सरकारला पाठिंबा दिल्यास कोणतीही कारवाई न करणे यांचा समावेश आहे.

भारतात जन्म घेण्याचे संकेत दिले होते दलाई लामांनी
पुढील दलाई लामावरून तयार झालेल्या युद्धासारख्या स्थितीपासून भारतही लांब नाही. कारण विद्यमान दलाई लामा चीनमधून निर्वासित झाल्यानंतर भारतात राहत आहेत. देश-विदेशात त्यांच्या सुरक्षेची चिंता भारताला आहे. तसेच दलाई लामांनी आधीच म्हटले आहे की, त्यांचा पुढचा जन्म एखाद्या स्वतंत्र देशात होईल. त्यांनी यासाठी भारताकडे इशाराही केला होता. त्यांनी ११३ वर्षांचा होईपर्यंत जिवंत राहण्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...