आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमध्ये 10 महिन्यांनंतर दहशतवादी हल्ला:4 जवान शहीद, किरकुक शहराजवळील चेकपॉइंटला केले लक्ष्य

किरकुक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराकमधील किरकुक येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये लष्कराचे चार जवान शहीद झाले. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, इस्लामिक स्टेटच्या (IS) दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी किरकुक शहराजवळील एका चौकीला लक्ष्य केले. एवढेच नाही तर दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराची शस्त्रे आणि दळणवळणाची साधनेही घेऊन गेले.

10 महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी महिन्यातही असाच हल्ला झाला होता. त्यानंतर आयएसच्या दहशतवाद्यांनी कुबा शहरातील अल-अझीम जिल्ह्यातील बॅरेकला लक्ष्य केले होते. सैनिक येथे झोपलेले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यादरम्यान एक सुरक्षारक्षक आणि 11 जवान शहीद झाले होते.

किरकुकचे गव्हर्नर राकान सईद अल-जिबौरी यांनी हा हल्ला निष्काळजीपणामुळे झाल्याचे सांगितले.
किरकुकचे गव्हर्नर राकान सईद अल-जिबौरी यांनी हा हल्ला निष्काळजीपणामुळे झाल्याचे सांगितले.

आयएसचे स्लीपर सेल सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत
2017 मध्ये इराक सरकारने ISIS चा पराभव केल्याचा दावा केला होता. सरकारने म्हटले आहे की, आयएसकडे स्लीपर सेल आहेत, जे सतत सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. इराकी सरकार अशा हल्ल्यांना मोठे आव्हान मानत असून त्यातून सुटका करण्यासाठी योजना तयार करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

2016 मध्ये झाला होता सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

जुलै 2016 मध्ये IS च्या दहशतवाद्यांनी इराकची राजधानी बगदादवर हल्ला केला होता. यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा आत्मघाती हल्ला होता. एका ट्रकने गर्दीच्या ठिकाणी धडक दिली त्यानंतर हा स्फोट झाला. सरकारने देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता.

बातम्या आणखी आहेत...