आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Terrorism Global Challenge | India At UNSC Need Zero Tolerance Approach To Defeat Terrorism | Marathi News

दहशतवाद ग्लोबल चॅलेंज:याच्याशी लढण्यासाठी जगाला एकत्र यावे लागेल : UN मध्ये भारत

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच UNSC मध्ये भारताने पुन्हा एकदा दहशतवाद हा जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या- झिरो टॉलरन्स दृष्टिकोनातून दहशतवाद संपवला जाऊ शकतो.

इराकच्या मुद्द्यावर चर्चा करताना कंबोज म्हणाल्या – इराकमध्ये सरकार आणि जनता इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL) या दहशतवादी गटाशी लढत आहे. दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. दहशतवादाचा धोका झपाट्याने वाढत आहे आणि जगाचा कोणताही भाग यापासून अस्पर्श राहिलेला नाही. हे थांबवण्यासाठी झिरो टॉलरन्सचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.

26/11 चा उल्लेख
रुचिरा कंबोज यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, दहशतवादाविरुद्धची लढाई तेव्हाच मजबूत होऊ शकते, जेव्हा दोषींना शिक्षा होईल. जगाच्या एका भागातील दहशतवाद हा संपूर्ण जगाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका आहे. म्हणूनच या आंतरराष्ट्रीय आव्हानाला आपला प्रतिसाद एकात्मिक, समन्वित आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभावी असणे आवश्यक आहे.

दहशतवादाबाबत दुटप्पी मापदंड स्वीकारता येणार नाही
ऑगस्टमध्ये झालेल्या UNSC बैठकीतही रुचिरा कंबोज यांनी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले होते. त्या म्हणाला होत्या- दहशतवादाबाबत दुटप्पी मापदंड स्वीकारता येणार नाही. या समस्येकडे आपल्या सोयीनुसार पाहणे धोकादायक ठरेल.

भारताकडे UNSC चे अध्यक्षपद

भारत हा डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले आहे. म्हणजेच या संपूर्ण महिन्यात रुचिरा या UNSC च्या अध्यक्ष असतील. भारताचा दोन वर्षांचा अस्थायी सदस्य म्हणून कार्यकाळ महिन्याच्या अखेरीस संपेल. यादरम्यान दहशतवाद आणि इतर जागतिक आव्हानांवर चर्चा होणार आहे.

भारत UNSC चा स्थायी सदस्य नाही
सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा चीन आहे. फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनविण्यास सहमती दर्शवली असली तरी चीन वेगवेगळ्या बहाण्याने भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध करत आहे.

याशिवाय UNSC च्या रचनेत बदल करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली आहे. यूएनएससीमध्ये विकसनशील देशांचे प्रतिनिधित्व कमी आहे. परंतु स्थायी सदस्यांना यामध्ये कोणताही बदल नको आहे आणि व्हेटो पॉवर अन्य कोणत्याही देशाला मिळावे, अशी त्यांची इच्छा नाही. भारताशिवाय जपान, जर्मनी आणि ब्राझील हे देशही सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...