आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला:गुरुद्वारा कार्त-ए-परवानजवळ दोन स्फोट, मुस्लिम रक्षकासह दोन ठार

काबुल14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गुरुद्वारा कर्ता परवानवर दहशतवादी हल्ला झाला आहे. टोलो न्यूजनुसार, येथे सकाळी 7.15 च्या सुमारास (भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता) हल्ला सुरू झाला. येथे दोन बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यात दोन अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

स्फोटानंतर आकाशात धुराचे लॉट दिसून आले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट (ISIS-K) च्या खुरासान मॉड्यूलचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

दरबार हॉलपर्यंत पसरली आग
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी सर्वात पहिले पाहिले हे दृश्य. गुरुद्वारातून आतापर्यंत 3 जण बाहेर पडू शकले आहेत. त्यापैकी दोघांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुस्लीम असलेल्या गुरुद्वाराच्या रक्षकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. तीन तालिबानी सैनिकही जखमी झाले. अजूनही 7-8 लोक आत अडकल्याची भीती आहे. श्री गुरू ग्रंथ साहिब आणि गुरुद्वाराच्या मुख्य दरबार हॉलमध्येही आग पसरल्याचे वृत्त आहे. किमान दोन हल्लेखोर गुरुद्वाराच्या आवारात असल्याचे समजते आणि त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही गोळीबार सुरूच आहे.

2 वर्षांपूर्वी गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला होता
25 मार्च 2020 रोजी, ISIS-हक्कानी नेटवर्कच्या बंदूकधारी आणि फिदायन हल्लेखोरांनी काबूलमधील गुरुद्वारा हर राय साहिबवर हल्ला केला. त्यावेळी गुरुद्वारामध्ये सुमारे 200 लोक उपस्थित होते, त्यापैकी 25 जणांचा मृत्यू झाला होतो. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. या हल्ल्यात 8 जण जखमी झाले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चकमक झाली, ज्यामध्ये सर्व दहशतवादी मारले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...