आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला, 9 लोकांचा मृत्यू, 4 दहशतवादी ठार, एका पोलिस अधिकाऱ्यासह 5 लोकांनीही गमावला जीव

कराची2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्स्चेंजवर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. मीडिया रिपोर्टनुसार, 4 दहशतवाद्यांसहित 9 लोक मारले गेले आहेत. यामध्ये एक पोलिस अधिकाऱ्यासहित 4 सिक्युरिटी गार्डस आहेत. सात लोक जखमी असून चार जणांची प्रकृती नाजूक आहे. दहशतवादी स्टॉक एक्स्चेंजच्या मेनगेटवर ग्रेनेड फेकून आत दाखल झाले.

मीडिया रपोर्ट्सनुसार, बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावरील काही ट्विटमध्ये तीन दहशतवाद्यांचा फोटोही शेअर केला जात आहे. हे दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे.

एक्स्चेंज उघडताच हल्ला 

मीडिया रिपोर्टनुसार, कराची स्टॉक एक्स्चेंज सकाळी 10.30 वाजता उघडते. आजही सकाळी एक्सचेंज उघडल्यानंतर सामान्य लोक आणि कर्मचाऱ्यांसोबत सशस्त्र दहशतवादी आत घुसले. दहशतवाद्यांना पाहताच लोक पळू लागले. या दरम्यान पोलिसांना सूचना देण्यात आली आणि काही वेळातच बिल्डिंगला घेरण्यात आले. जियो न्यूजनुसार स्टॉक एक्स्चेंजच्या 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी सुरुवातीला पार्किंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस तैनात करत नाहीत
मिळालेल्या माहितीनुसार कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये पोलिस तैनात नाहीत. येथील सुरक्षा खासगी कंपनीच्या मालकीची आहे. जिओ न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार गुप्तचर विभागाला काही दिवसांपूर्वीच कराचीमध्ये दहशतवादी कोणताही मोठा हल्ला करू शकतील अशी एक  बातमी मिळाली होती. असे असूनही येथे सुरक्षेची व्यवस्था केलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...