आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांचा गुन्हा तरी काय?:शिकून प्रगतीसाठी धडपडणाऱ्या अफगाण महिलांवर अतिरेकी हल्ला

काबुल( थॉमस गिबन्स-नेफ, नजीम रहीम)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मुली शाळेतून घरी परतताना केला हल्ला - Divya Marathi
मुली शाळेतून घरी परतताना केला हल्ला
  • 2001 नंतर प्रगतीच्या वाटेवरील महिला हिटलिस्टवर
  • अमेरिकी सैन्य माघारीदरम्यान 190 ठिकाणी स्फोट

अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जात आहे. या काळात दहशतवादी हल्ले वाढले. शनिवारी राजधानी काबूलमध्ये सय्यद-उल-शुहादा हायस्कूलच्या बाहेर बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ५३ झाली आहे. मुले शाळेतून घरी परतत असताना हा हल्ला झाला होता.

मृतांमध्ये बहुतांश ११ ते १५ वर्षीय मुलींचा समावेश असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियान म्हणाले, जखमींची संख्या १०० वर आहे. या शाळेत मुले व मुली शिकतात. सर्वांच्या वेळा वेगळ्या आहेत. ही शाळा तीन शिफ्टमध्ये काम करते.

विद्यार्थिनी दुसऱ्या शिफ्टमध्ये अध्ययन करतात. मुलींची शाळा सुटल्यानंतर दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यानंतर अमेरिका-तालिबान शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह आहेत. इस्लामिक स्टेट जाळे मजबूत करण्याचे काम करत आहे. दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असल्या तरी नवे स्वप्न घेऊन प्रगतीच्या वाटेवरील अफगाणी महिलांच्या सुरक्षेबाबत आता जास्त चिंता वाढली आहे.

शाळेत जाणारी पावले रक्तबंबाळ
शाळेत जाणारी पावले रक्तबंबाळ
  • १ मे रोजी माघारीचा इशारा देत ३० एप्रिलपासून हल्ले वाढवले.
  • 1 मेपर्यंत तालिबानच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेतील सैन्याला अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.
  • 25 एप्रिलपासून अमेरिकेने आपले माघारीस सुरुवात केली. सर्व लष्करी साहित्य,जवान ११ सप्टेंबरपर्यंत परततील.
  • 30 एप्रिलला लोगर प्रांतात स्फोटकांनी भरलेला ट्रक उडवला. त्या हल्ल्यात २७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
  • 2 मे रोजी बदख्शान प्रांतातील वारदूजमध्ये दहशतवाद्यांनी सैन्यातील एका महत्त्वाच्या पुलावर ताबा घेतला. ८ जवानांना ठार केले.
  • 6 मे रोजी गजनीमध्ये तालिबानींनी एका छावणी व लष्करी तळावर ताबा मिळवला. ८ जवानांनी शरणागती पत्करली.
  • 1 आठवड्यात तालिबानी दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या हल्ल्यात सुरक्षा दलातील १४० जवान, ४४ नागरिक मारले गेले.

शियाबहुल भागात हल्ले सुरूच
हल्ले शियाबहुल भागात झाले. तालिबानने त्याची जबाबदारी स्वीकारली नाही किंवा घटनेचा निषेधही केला नाही. शिया मुस्लिमांवर येथे सातत्याने हल्ले होतात. येथील हल्ल्याची जबाबदारी नेहमी इस्लामिक स्टेटसंबंधी गटाकडून स्वीकारली जाते. कट्टर सुन्नी मुस्लिम समूहाने अफगाणिस्तानातील शिया मुस्लिमांच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

प्रगतीची आस असलेल्या ४०० महिलांची हत्या
अफगाणिस्तानात गेल्या एक महिन्यात ४२८ सुरक्षा जवान, सामान्य नागरिकांचा तालिबानी हल्ल्यात मृत्यू झाला. ५०० हून जास्त लोक जखमी जाले. १९० ठिकाणी स्फोट करण्यात आले. बहुतांश हल्ले उरुजगन, जाबूल, कंदहार, नानगरहर, बदख्शान व ताखर भागात हिंसाचार झाला. कुनार प्रांत परिषदेचे सदस्य नासिर कामवाल म्हणाले, कुनारमध्ये महिनाभरात बॉम्बहल्ला झाला नाही, असा एकही दिवस गेला नाही.

पत्रकार, उच्चशिक्षित, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्य
अमेरिकी सैन्य गेल्यावर काय होईल, हीच एक चिंता अफगाणिस्तानातील महिलांना सतावू लागलीये. अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेच्या म्हणण्यानुसार २०२० मध्ये दहशतवाद्यांनी प्रगतीची आस असलेल्या सुमारे ४०० महिलांची हत्या केली. त्यात पत्रकार, उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तालिबानने २००१ नंतर शिक्षण घेतलेल्या महिलांच्या हत्येचीदेखील यादी तयार करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...