आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टेस्ला कंपनी तयार करतेय ह्युमनॉइड रोबोट; मजुरासारखे तो काम करेल, अवजड सामान उचलेल, कारची फिटिंगही करेल

सॅन फ्रान्सिस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराणाच्या पिशव्या उचलण्याचा आता कंटाळा आलाय, उठ-बस होत नाही आणि कष्टाचे किंवा जोखमीचे काम आता नको आहे तर मग निश्चिंत व्हा. कारण अमेरिकी इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी टेस्ला असा रोबोट तयार करत आहे, जो अगदी मजुरासारखे काम करेल. सर्व छोटी-मोठी कामे त्याला सांगता येतील. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी कंपनीच्या एआय डेनिमित्त हा ह्युमनॉइड रोबोट “टेस्ला बॉट’ लाँच करण्याची घोषणा केली.

मस्क म्हणाले, पुढील वर्षापर्यंत याचे प्रोटोटाइप तयार केले जाईल. हा रोबोट ‘ऑप्टिमस’ कोडनेमनुसार तयार केला जात आहे. हे कोडनेम हॉलीवूडचा चित्रपट “ट्रान्सफॉर्मर सेरिज’मधील बहुचर्चित व्यक्तिरेखेशी संबंधित आहे. तो अगदी परिपूर्ण असेल. यात ८ कॅमेरे असलेली ऑटो पायलट ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिमही असेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या होत असलेल्या नुकसानीबाबत मस्क नेहमी भाष्य करत. मात्र, आता टेस्ला जो रोबोट तयार करेल तो अगदी मित्रच असेल. परंतु तो मानवी क्षमतांवर मात करू शकणार नाही. मस्क यांच्यानुसार, नेहमीची तीच ती कामे आणि धोकादायक कामांसाठी लोक बॉटचा वापर करतील. खरी परीक्षा तेव्हा असेल जेव्हा कोणतीही स्पष्ट सूचना नसताना हा रोबोट जगभर नेव्हिगेट करेल. आता मानवाने छोटी-मोठी कामे रोबोटसोबत करण्यास सज्ज व्हायला हवे, असे मस्क म्हणतात. भविष्यात शारीरिक कष्ट हा एक पर्याय ठरू शकेल, असे त्यांना वाटते. या कार्यक्रमात टेस्लाने ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टिम तयार करण्यासाठी मदतीच्या दृष्टीने आपले हाय स्पीड कॉम्प्युटर, डोझोसाठी कंपनीतच तयार केलेली चिप्स पण दाखवली. त्यानुसार, डोझो एका वर्षाच्या आत पूर्ण क्षमतेने काम सुरू करू शकेल, असा दावा मस्क यांनी या वेळी केला.

चाकाचे रोबोट होतेच, आता ह्युमनॉइड रोबोटसाठी सर्व काही उपलब्ध : मस्क
कॅलिफोर्नियातील फ्रॅमोंटस्थित कारखान्यात मस्क यांनी या रोबोटचे सादरीकरण केले. हा रोबोट ५.८ फूट लांब आणि सुमारे ५७ किलो वजनाचा असेल. तो ६८ किलो वजन उचलू शकेल, २० किलो वजन घेऊन ताशी ८ किमी वेगाने चालू शकेल. मस्क यांनी सादरीकरणानंतर लगेच ट्विटरवर टेस्ला कारचा उल्लेख करून सांगितले, आमच्याकडे ह्युमनॉइड रोबोटसाठी सर्व साहित्य उपलब्ध आहे. कारण, अगोदरच आम्ही चाके असलेले रोबोट तयार करत आहोत. हा रोबोट टेस्लासाठी कठीण नाही. कारण, कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासूनच तो तयार होईल.

बातम्या आणखी आहेत...