आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:मस्क यांची निवड म्हणजे ‘सर्वात वाईट’! टेस्लाचे सीईओ ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’वरून टीकेचे धनी

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टेस्ला व स्पेस एक्सचे मालक तथा जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क यांची टाइम नियतकालिकाने पर्सन आॅफ द इयरसाठी निवड केली आहे. परंतु या निवडीवरून मस्क यांच्यावर टीकेची झाेड उठली आहे.

कर चुकवेगिरी करणारे, काेराेनाबद्दलची बेपर्वाई दाखवणाऱ्या मस्क यांची परीक्षकांनी निवड केली आहे, असा आराेप टीकाकारांनी केला. टाइमने त्यांचे वर्णन दूरदर्शी, प्रतिभावान, शाेमॅन, अतिशय आकर्षक रूपाने केले आहे. परंतु नियतकालिकाने मांडलेले हे अर्धसत्य म्हणावे लागेल. वास्तविक मस्क अमेरिकेत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहेत. मस्क यांच्या वर्तनावर सातत्याने टीका हाेत आली. त्यातही बिलेनियर टॅक्सला त्यांचा विराेध जगजाहीर आहे. मस्क यांनी कर कमी भरून इतर श्रीमंतांच्या यादीत २०१४ ते २०१८ दरम्यान आपल्या संपत्तीत वाढ केली. मस्क यांनी केवळ ३.२७ टक्के दराने कर भरणा केला. सिनेटर एलिझाबेथ वाॅरेन म्हणाले, टाइमच्या निर्णयामुळे कर प्रणालीत सुधारणा करण्याची गरज अधाेरेखित झाली आहे. म्हणूनच वर्षातील सर्वाेत्कृष्ट व्यक्ती कर भरणारा असला पाहिजे. अशाच व्यक्तीची निवड झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. प्रमिला जयपाल यांनी देखील हेच मुद्दे मांडले. ते म्हणाले, आता तरी मस्क यांनी कराचा भरणा केला पाहिजे. हीच वेळ आहे. कल्पना लढवून कर चुकवणारा पर्सन आॅफ द इयर कसा काय?

संघटनेत सहभागी कामगारांना धमकी
माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री राहिलेले राॅबर्ट रिच म्हणाले, मस्क यांनी २०१९ मध्ये केलेल्या घाेषणेला उजाळा देण्याची ही वेळ आहे. संघटनेत सहभागी कामगारांनासंघटनेत सहभागी झाल्यास त्यांना शेअर गमवावा लागेल, अशी धमकी दिली होती. खरे तर मस्क राेज बेजबाबदार विधाने करत असतात.

बातम्या आणखी आहेत...