आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथायलंडच्या आखातात रविवारी रात्री उशिरा थायलंडच्या नौदलाची युद्धनौका बुडाली. जहाजावरील 106 पैकी 78 खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. यातील ३ जण गंभीर जखमी आहेत. 28 लोक अजूनही पाण्यात असल्याची माहिती नौदलाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. त्यांच्या बचावासाठी ऑपरेशन सुरू आहे.
जोरदार लाटांमुळे युद्धनौका 60 अंशांवर झुकली
नौदलाचे प्रवक्ते पोकरोंग मॉन्थटपलिन यांनी सांगितले की, HTMS सुखोथाई ही युद्धनौका बॅंग सफानजवळ गस्तीवर असताना वादळात अडकली. जोरदार लाटांमुळे ही युद्धनौका 60 अंशांपर्यंत झुकली. यानंतर बोटीत पाणी भरले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि युद्धनौकेचे मुख्य इंजिन बंद पडले.
यानंतर नौदलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. बचावकार्यासाठी एचटीएमएस आंगथोंग, एचटीएमएस भूमिबोल अदुल्यादेज, एचटीएमएस काराबुरी आणि 2 हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले.
सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत फोटो
युद्धनौका बुडाल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये जहाज पाण्यात पडताना दिसत आहे. जहाज बुडाल्याचे आणि बचाव कार्याचे अनेक व्हिडिओही शेअर केले जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलाशी गंभीर जखमी आहेत, परंतु आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
युद्धनौका 36 वर्षांपासून सेवा देत आहे
HTMS सुखोथाई सन 1987 पासून म्हणजेच गेल्या 36 वर्षांपासून सेवेत आहे. हे अमेरिकेच्या टॅकोमा बोटबिल्डिंग कंपनीने बांधले आहे. याद्वारे थायलंडचे नौदल हवाई संरक्षण, सागरी लढाऊ आणि पाणबुडीविरोधी कारवाया करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.