आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडच्या बाल संगोपन केंद्रात गोळीबार:24 मुलांसह 36 जण ठार; हल्लेखोराने प्रथम पत्नी-मुलांना ठार केले, त्यानंतर स्वतःला गोळी घातली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लेखोर थायलंड पोलिसांचा माजी कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे.

थायलंडमधील नोंग बुआ लाम्फू प्रांतातील एका बाल संगोपन केंद्रात गुरूवारी एका माथेफिरू व्यक्तीने बेछूट गोळीबार केला. त्यात 24 मुलांसह तब्बल 36 जणांचा बळी गेला. हा गोळीबार उत्तर प्रांतातील नॉन्गबुआ लम्फू येथे झाला.

या घटनेचे काही व्हिडिओ उजेडात आलेत. त्यात नागरिक गोळीबारापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. हल्लेखोर थायलंड पोलिसांचा माजी कर्मचारी असल्याचा दावा केला जात आहे. अंमली पदार्थ प्रकरणी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

गोळीबारानंतरची स्थिती

पोलिसांच्या माहितीनुसार, 34 वर्षीय पन्या कामराब नामक व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हल्लेखोराला मादक पदार्थांच्या तस्करीत हात होता. त्यामुळे त्याची पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आली होती.

हल्लेखोर पन्या कामराब.
हल्लेखोर पन्या कामराब.
गोळीबारात जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना बचाव पथकाचे सदस्य
गोळीबारात जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना बचाव पथकाचे सदस्य
थायलंडचे सुरक्षा कर्मचारी
थायलंडचे सुरक्षा कर्मचारी

2020 मध्येही गोळीबाराची घटना

2020 मध्ये एका सैनिकाने 29 लोकांना ठार केले. तसेच या घटनेत 57 जण जखमी झाले होते. सैनिक मालमत्तेच्या व्यवहाराचा त्याला राग होता. त्याने चार ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता.

बातम्या आणखी आहेत...