आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंड निवडणूक:PM पदाच्या उमेदवार शिनावात्रा यांनी दिला मुलाला जन्म, प्रेग्नेसी काळातही केला प्रचार, 14 मेला निवडणूक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
उंग यांनी आपल्या मुलासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. - Divya Marathi
उंग यांनी आपल्या मुलासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

थायलंडमध्ये 14 मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वलस्थानावर असलेल्या नेत्यांमध्ये 36 वर्षीय पीटोंगर्न शिनावात्रा यांचा दावा सर्वात मजबूत मानला जात आहे. देशात त्यांना प्रेमाने उंग इन च्या नावाने संबोधले जाते. दरम्यान, उंग इन यांनी सोमवारी एका मुलाला जन्म दिला. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर फोटोसह माहिती शेअर केली. तर मुलाचे नाव थासीन ठेवण्यात आले.

गर्भधारणेदरम्यान देखील प्रचार

देशात निवडणुका आहेत आणि याच दरम्यान शिनावात्रा गर्भवतीही होत्या. असे असतानाही त्यांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला. आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्वेक्षणात त्यांच्या फेयू थाई पक्षाला विजयाचा प्रबळ दावेदान असल्याचे सांगितले जात आहे. या पक्षाने त्यांना अधिकृतपणे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले आहे.

500 सदस्यांच्या संसदेत शिनावात्रा यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील आणि त्या पंतप्रधान होतील, असा विश्वास आहे. आता लष्कराने पाठिंबा दिलेल्या पक्षांचा विजय होतो की, उंग इन यांचा फेयू थाई पक्ष विजयी होतो हे पाहायचे आहे.

2006 मध्ये उंग यांचे वडील थाक्सिन शिनावात्रा आणि 2014 मध्ये त्यांची काकू यिंगलक यांचे सरकारे लष्करी उठाव करून पदच्युत करण्यात आली. आता या घराण्याची तिसरी पिढी सत्तेसाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

अब्जाधीश कुटुंबातील व्यक्ती

  • उंग यांचे वडील पूर्वी पोलिस अधिकारी होते. नंतर त्यांनी दूरसंचार उद्योग सुरू केला आणि लवकरच ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2001 मध्ये मोठा विजय मिळवून पंतप्रधान बनले. मोफत आरोग्य सेवा आणि गावांचा विकास यासाठी त्यांनी भरीव काम केले. यामुळेच 2005 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक झाली तेव्हाही त्यांना दणदणीत विजय मिळाला होता.
  • 1932 नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी एक नव्हे तर दोन कार्यकाळ पूर्ण केले. तथापि, थाक्सिनच्या यशावर लष्कर फारच नाखूष होते आणि त्यामुळेच 2006 मध्ये सत्तापालट करून त्यांना खुर्चीवरून हटवण्यात आले.
  • 2008 मध्ये देश थाकसिन यांनी देश सोडला आणि तो लंडन आणि दुबईमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. लष्कराने त्याच्यावर वेगवेगळे आरोप लावून त्याला तुरुंगात टाकण्याची तयारी केली होती.
  • मुलगी उंग दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर, थाक्सिन हे सोशल मीडियावर म्हणाले की, मी सातव्यांदा आजोबा झालो आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबातील हे सातवे अपत्य असून देखील मी प्रत्येक वेळी मी देशाबाहेर होतो. आशा आहे की, मी जुलैमध्ये 74 वर्षांचा होईल, कदाचित मी सर्व मुलांना पुन्हा एकत्र भेटेन.

देशात परत येऊ शकतात थाक्सिन
थायलंडमध्ये चर्चा आहे की, उंग यांचे वडील थाक्सिन यांना माफ केले जाऊ शकते. त्यांना देशात परत आणले जाऊ शकते. विद्यमान पंतप्रधान प्रयुथ चानोचा यांनी याला विरोध केलेला नाही. उंग यांच्या पक्षाने अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. देशाची अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणणे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणे यांचा समावेश आहे.

थायलंडमध्ये सामान्यतः निवडणुका शांततेत पार पडतात, परंतु यावेळी उंग यांची लोकप्रियता पाहता लष्करच निवडणूक हिंसाचार करू शकते, असे मानले जाते. त्यासाठी लष्करानेही युवा ब्रिगेडचा वापर सुरू केला आहे. ते शिनावात्रा यांना विरोध करत आहेत.