आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकॉक:थायलंडचे पर्यटन भारताच्या भरवशावर; दिवाळीनंतर भारतीय पोहोचणार, ते सरासरी 1.70 लाख रु. खर्चतील

बँकॉक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन आणि मलेशियानंतर सर्वाधिक भारतीय पर्यटक थायलंडच्या पर्यटनावर

थायलंडची लोकसंख्या सुमारे ७ कोटी आहे. प्रत्येक वर्षी येथे सुमारे ४ कोटी पर्यटक जगभरातून पोहोचतात. थायलंडला येणाऱ्यांत भारतीय तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर प्रथमस्थानी चीन तर दुसऱ्या स्थानी मलेशिया आहे. मात्र कोरोना महामारीमुळे थायलंड परदेशी पर्यटकांची प्रतीक्षा करत आहे. मागील ८ महिन्यांत येथे केवळ ७३९३२ पर्यटक पोहोचले आहेत. त्यामुळे थायलंड पर्यटकांसाठी आसुसलेला आहे. थायलंडने या वर्षी आपल्या पर्यटकांच्या आगमनाचा अंदाज ५ लाखाहून घटवून २.८० लाख केला आहे. दरम्यान, १८ महिन्यांनंतर नोव्हेंबरपासून थायलंड विदेशी पर्यटकांना आपल्या देशात प्रवेश देणार आहे.

विशेष बाब म्हणजे तो चीन आणि मलेशियाऐवजी भारताला प्राधान्य देत आहे. थायलंड पर्यटन परिषदेचे उपाध्यक्ष सोमसोंग सिचफिमुख म्हणाले की, ‘आम्ही १ नोव्हेंबरपासून पर्यटनस्थळे सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दिवाळीचा योग सर्वात चांगला वाटत आहे. कारण दिवाळीनंतर भारतीय लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील. भारतीयांकडे खूप जास्त खर्च करण्याची ताकद असते. भारतीय आमच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यास मोठा हातभार लावू शकतील. ’ सोमसोंग म्हणाले की, एक भारतीय पर्यटक थायलंड दौऱ्यात २७ हजार थाई बाट (सुमारे ६० हजार रु.) ते ७६ हजार बाट (सुमारे १.७० लाख रु.) खर्च करू शकतो. त्याशिवाय डेस्टिनेशन वेडिंगवर १० मिलियन बाट ते १२० मिलियन (सुमारे २.२० कोटी ते २६.३० कोटी रु.) खर्च करू शकतो.

२० लाख भारतीयांकडून १७,५०० कोटींचा महसूल
२०१९ मध्ये जगभरातील ४ कोटी पर्यटक पोहोचले होते. यात थायलंडला ४.४४ लाख कोटी रु. चा महसूल मिळाला होता. सुमारे २० लाख भारतीयांकडून १७,५४८ कोटींचा महसूल मिळाला. सोमसोंग यांनी सांगितले, मागील १८ महिन्यांत थायलंड कोरोनाच्या सर्वात वाईट काळातून जात होता. या काळात पर्यटनाशी संबंधित ३० लाख नोकऱ्या गेल्या. पण भारतीय आमच्या टुरिझम इंडस्ट्रीसाठी बुस्टर डोसचे काम करू शकतील.

बातम्या आणखी आहेत...