आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र तिबेटच्या गुगे साम्राज्यातील भग्न अवशेषांचे आहे. या साम्राज्याचा कालखंड सुमारे ११०० वर्षांपूर्वी दहाव्या शतकातील होता. तिबेट साम्राज्यातील अंतिम सम्राट लँग्डर्मा यांचा पणती काइदे न्याइमगन ९१० मध्ये त्सांग येथे आणीबाणीच्या स्थितीत पळून नगारी (पश्चिम तिबेट) भागात दाखल झाले. त्यांनी ९१२ च्या सुमारास पुरंग व गुगे यांना जोडून एका राज्याची स्थापना केली. गुगेचे खंडर त्सापरंगोमध्ये सतलज खोऱ्यात अस्तित्वात आहेत. त्याच्याजवळच कैलास पर्वत आहे. हा भागा ल्हासापासून १९०० किमी अंतरावर आहे. तिबेट सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या प्राचीन वास्तूंचे संरक्षण व्हावे म्हणून तज्ञांची मदत घेतली आहे.
चीनचा डोळा : गुगे साम्राज्याच्या भागावर चीनची नजर आहे. या भागात पर्यटन तसेच खनिज संपत्तीवरही चीनचा डोळा आहे. म्हणूनच तिबेटने तज्ञांची मदत घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.