आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण कोरियात एकलकोंडेपणा वाढला आहे. महागाईमुळे लग्न आणि अपत्यप्राप्त केली जात नाही. स्थिती एवढी बिकट झाली आहे की, लाखो लोक आपल्या घरात एकटे राहत आहेत. यात अनेकांचा तर मृत्यूही झाला आहे. हजारो प्रौढांचे मृतदेह त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी वा महिन्यांनी सापडत आहेत. याला येथे गोडोकसा किंवा बेवारस स्थितीतील मृत्यू म्हटले जाते.
सरकार असे मृत्यू रोखण्यासाठी काही वर्षांपासून झगडत आहे. मात्र,यात दरवर्षी वाढ होत आहे.द.कोरियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात अशा मृतांची संख्या ३,३७८ नोंदली होती. ही २०१७ मध्ये २,४१२ होती. सरकारने २०२१ मध्ये लाेनली डेथ प्रिव्हेशन अँड मॅनेजमेंट अॅक्ट लागू केला होता. देशाचे लोकशाहीचे संकट, गरिबी आणि सामाजिक दुराव्यामुळे कोविड महामारीनंतर या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांत ५.३ पट एकाकी मृत्यू
एकाकी मृत्यूत पुरुषांची संख्या २०२१ मध्ये महिलांच्या तुलनेत ५.३ पट होती. २०१६ पर्यंत ४३% ज्येठ कोरियाई दारिद्र्य रेषेखाली होते. हे अन्य ओईसीडी देशांच्या राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.