आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनेस्को वारसास्थळाच्या अस्तित्वावर संकट:मोहंजोदडोच्या 4500 वर्षे जुन्या भिंती पुराने ढासळल्या

इस्लामाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात पुरामुळे सुमारे ४५०० वर्षे एवढ्या प्राचीन मोहंजोदडो या जागतिक वारसास्थळावर संकट आेढवले आहे. मुसळधार पावसामुळे वारसास्थळाच्या भिंती कोसळल्या आहेत. सिंध प्रांतातील मोहंजोदडोमध्येदेखील जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसाचा मारा भिंती सोसू शकल्या नाहीत. मोहंजोदडोचे संरक्षक अहसान अब्बासी म्हणाले, मोहंजोदडोच्या नगरातील नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून गेले. परंतु मुसळधार पावसामुळे भिंतींचा पाया डगमगू लागला आहे. त्याची दुरुस्ती केल्यास या क्षेत्रातील प्राचीनता संपुष्टात येईल अशीही शक्यता आहे. इतिहासकारांनी अशा प्रकारच्या डागडुजीला विरोध दर्शवला आहे. सिंधू संस्कृतीमधील ४५०० वर्षांपूर्वीचे हे शहर आहे. १९२२ मध्ये हे शहर सापडले होते. ते सध्या पाकिस्तानातील सिंधमध्ये आहे. चांगल्या नगररचनेचा प्राचीन नमुना असलेले मोहंजोदडो युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वीचे हे शहर कसे नष्ट झाले हे एक रहस्य आहे. पाकिस्तानात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ हजार ३४३ झाली आहे. सव्वातीन कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ बुधवारी म्हणाले, हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर उपाय काढण्यासाठी प्रगत देशांनी आणखी मदत करायला हवी. आगामी ४८ तासांत सिंध व बलुचिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला .

बौद्ध स्तूप सुरक्षित मोहंजोदडोजवळील बौद्ध स्तूप मुसळधार पाऊस व पुरस्थितीनंतरही सुरक्षित आहे. या स्तुपाचा निर्माण काळ सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. हे स्तूप पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. हे बांधकाम उन्नत तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात आले होते, असे पुरातत्त्व तज्ज्ञांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...