आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील रस्ता बनला पर्यटन स्थळ:डोंगर कापून बनवला 9.5 किमी लांब महामार्ग, पार करण्यास लागतात 30 मिनिटे

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र चीनच्या शांक्सी प्रांतातील आहे. तेथील लिंटोंगमध्ये समुद्रसपाटीपासून ३,३९२ फूट उंचीवरील लिशान पर्वतरांगांतील डोंगर कापून सर्वात सुंदर वळणदार रस्ता तयार केला आहे. याला पानशान हायवे म्हणतात. हे छायाचित्र ब्रिटनच्या बेलफास्ट येथील चीनचे महावाणिज्य दूत झेंग मीफेंग यांनी शेअर केले आहे. त्यांनी लिहिले आहे, निसर्गाने

नटलेल्या डोंगरातील या महामार्गावरून जाण्याचा आनंद वेगळाच आहे. यावरून जाणे हे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहेत. लिशान पर्वतामधील या महामार्गाची लांबी ९.५ किलोमीटर आहे. याच महामार्गाने गेल्यास पुढे राष्ट्रीय उद्यान आहे. मोठे चढ-उतार असतानाही यू टर्नवरील रुंदी तीनपट वाढते, अशाप्रकारे या महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. हवामान स्वच्छ असते तेव्हा येथे मोठ्या संख्येने पर्यटक ड्रायव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी येतात. हायवेवर अनेक ठिकाणी व्ह्यू पॉइंटही बनवण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...